उधारी दिली नाही म्हणून दिवसाढवळ्या भोसकले !; सीसीटीव्ही फूटेज थरकाप उडवणारे

कलबुर्गी येथील जमीर नावाच्या तरुणाने ओळखीच्या समीर नामक तरुणाकडून 9 हजार रुपये उसने घेतले होते.

उधारी दिली नाही म्हणून दिवसाढवळ्या भोसकले !; सीसीटीव्ही फूटेज थरकाप उडवणारे
उधारी दिली नाही म्हणून दिवसाढवळ्या भोसकले !
Image Credit source: Aaj Tak
| Updated on: Sep 19, 2022 | 8:42 PM

कर्नाटक : उधार घेतलेले पैसे दिले नाही म्हणून तरुणा (Youth)ला संपवल्याची थरारक घटना कर्नाटकातील कलबुर्गी येथे घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. हत्या (Murder) केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलीस अधित तपास करत आहेत. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

उधार घेतलेले 9 हजार रुपये देण्यास टाळाटाळ

कलबुर्गी येथील जमीर नावाच्या तरुणाने ओळखीच्या समीर नामक तरुणाकडून 9 हजार रुपये उसने घेतले होते. काही दिवसांनी समीरने उधार घेतलेले पैसे परत मागितले. मात्र जमीरने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली.

पैशांवरुन पाडित आणि आरोपीमध्ये वाद

जमीर पैसे परत करत नसल्याने दोघांमध्ये वाद झाला. शनिवारी जमीर जेवारगी रोडजवळून जात होता. यादरम्यान समीरने त्याचा मित्र आकाशसोबत मिळून जमीरवर हल्ला केला.

रागाच्या भरात आरोपीने मित्रासोबत मिळून तरुणावर केला हल्ला

समीरने धारदार शस्त्राने हल्ला करताच जमीर पळू लागला. मात्र समीर आणि आकाशने त्याला धावत पकडले आणि जमिनीवर पाडून भोसकले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने जमीरचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपी फरार, सीसीटीव्ही फूटेजद्वारे शोध सुरु

हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. नागरिकांची ये-जा सुरु होती, मात्र कुणीही तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.