कारला बांधून फरफटत नेले कुत्र्याला, ‘या’ कारणातून डॉक्टरने केले अमानुष कृत्य

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधीत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारला बांधून फरफटत नेले कुत्र्याला, 'या' कारणातून डॉक्टरने केले अमानुष कृत्य
कारला दोरीने बांधून फरफटत नेले कुत्र्यालाImage Credit source: Aaj Tak
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 8:03 PM

जोधपूर : राजस्थानमधील जोधपूरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका डॉक्टर (Doctor)ने रस्त्यावरील कुत्र्याला गाडीला बांधून अमानुषरित्या फरफटत नेल्याची घटना जोधपूरच्या हायप्रोफाईल परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरवर प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील डॉग होम फाउंडेशन (Dog Home Foundation)च्या लोकांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

जोधपूरमधील शास्त्री नगरमध्ये डॉ. रजनीश गलवा हे रस्त्यावरील कुत्र्याला डॉग चैनच्या सहाय्याने आपल्या कारला बांधून फरफटत नेत होते. यादरम्यान रस्त्यावरुन जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने ही घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधीत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे व्हिडिओमध्ये ?

व्हिडिओमध्ये कुत्र्याला कारच्या दाराला बांधलेले दिसत आहे. कुत्र्याला गाडीच्या वेगाने धावता येत नसल्याने त्याची मान ओढली गेली. यानंतर रस्त्याने चाललेल्या नागरिकांनी कारला थांबवले आणि कुत्र्याची सुटका केली. कुत्र्याला दुखापत झाली आहे.

नागरिकांनी याबाबत डॉग होम फाऊंडेशनला माहिती दिली. माहिती मिळताच डॉ होम फाऊंडेशनचे लोक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुत्र्याला ताब्यात घेतले आहे.

शास्त्रीनगर पोलिसात डॉक्टर विरोधात तक्रार दाखल

फाऊंडेशनच्या लोकांसह आणि उपस्थित नागरिकांनीही सदर डॉक्टरला चांगलेच खडसावले. फाऊंडेशच्या सदस्यांनी याबाबत शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्राणी क्रूरता कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

डॉक्टरच्या घराजवळ हा कुत्रा रहायचा

डॉक्टर ज्या परिसरात राहतो, तेथे त्याच्या घराजवळ हा कुत्रा असायचा. त्यामुळे या कुत्र्याला घरापासून लांब सोडून येण्याच्या उद्देशाने डॉक्टर त्याला गाडीला बांधून अमानुष पद्धतीने घेऊन जात होता.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.