UP Crime : अल्पवयीन मुलीच्या अचानक पोटात दुखू लागले, डॉक्टरकडे तपासणी केली असता धक्कादायक बाब उघड

| Updated on: Aug 09, 2022 | 7:12 PM

गावातील एका 40 वर्षीय व्यक्तीने मुलीला आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवला असल्याचा आरोप आहे. यानंतर ती गरोदर राहिली. तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात आली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

UP Crime : अल्पवयीन मुलीच्या अचानक पोटात दुखू लागले, डॉक्टरकडे तपासणी केली असता धक्कादायक बाब उघड
अमृतसरमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत बॉम्ब
Follow us on

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या अचानक पोटात खूप दुखू लागले. कुटुंबीयांनी तिला तात्काळ डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता मुलगी गर्भवती (Pregnant) असल्याचे कळले. यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. शेजारी राहणाऱ्या 40 वर्षीय नराधमाने मुलीसोबत गैरकृत्य केल्याचे मुलीने सांगितले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

अल्ट्रासाऊंड रिपोर्ट आल्यानंतर कुटुंबीयांना धक्काच बसला

आरोपी अनेक दिवसांपासून धमकावून तिच्यावर बलात्कार करत होता. अचानक तिच्या पोटात दुखू लागले आणि वडील तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड करायला सांगितले. रिपोर्ट आल्यानंतर मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे कळले. हे पाहून तिची आणि तिच्या कुटुंबीयांची तारांबळ उडाली. शेजारी राहणारा व्यक्ती आपल्याशी सतत चुकीचे कृत्य करत असल्याचे मुलीने वडिलांना सांगितले. कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांसह सर्वांना ठार मारेन, अशी धमकी त्याने दिली होती. यानंतर मुलीच्या स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र स्थानिक पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानंतर वरिष्ठांकडून स्थानिक पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

एसपी समर बहादूर यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीने गुन्हा दाखल केला आहे. गावातील एका 40 वर्षीय व्यक्तीने मुलीला आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवला असल्याचा आरोप आहे. यानंतर ती गरोदर राहिली. तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात आली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Abuse of minor girl by neighbour in Uttar Pradesh, girl months pregnant)

हे सुद्धा वाचा