चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल; बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशी होणार

| Updated on: Feb 27, 2021 | 10:47 AM

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (acb filed a case against chitra wagh husband kishor wagh)

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल; बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशी होणार
किशोर वाघ
Follow us on

मुंबई:  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेची वारंवार मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या पूर्वी किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. (acb filed a case against chitra wagh husband kishor wagh)

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात चित्र वाघ या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.

काय आहे प्रकरण?

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून कार्यरत होते. 1997 मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा स्पाइनल कॉर्डच्या शस्त्रक्रिये दरम्यान गांधी रुग्णालयात मृत्यू झाला होता. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला होता. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर तक्रारदाराने राष्ट्रीय ग्राहक निवारण कक्षाकडेही तक्रार केली होती. त्यानंतर वैद्यकीय नोंदी ठेवणारे किशोर वाघ यांनी 15 लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारदाराच्या भावाच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून अर्ज करण्याची सूचना तक्रारादारास केली होती. त्यासाठी वाघ यांनी चार लाखांची लाचही मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

एक कोटीची बेहिशोबी मालमत्ता आढळली

त्यानंतर एसीबीने सापळा रचून 5 जुलै 2016 रोजी किशोर वाघ यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. त्यानंतर एसीबीकडून 1 डिसेंबर 2006 ते जुलै 2016 दरम्यान वाघ यांच्याकडे असलेल्या उत्पन्नाचा तपास करण्यात आला होता. या तपासात त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली होती. त्यांच्या उत्पन्ना पेक्षा 90 टक्के अधिक ही रक्कम होती. त्यानंतर एसीबीने 12 फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राठोड प्रकरणी वाघ आक्रमक

दरम्यान, चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली आहे. आता त्यांच्याच पतीच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे भाजपची सत्ता असतानाचं हे प्रकरण आहे. या प्रकरणानंतर वाघ यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेशही केला होता. हे प्रकरण घडल्यानंतरच वाघ यांनी पक्ष बदलल्याने त्याबद्दल तर्कवितर्कही लढवले गेले होते. (acb filed a case against chitra wagh husband kishor wagh)

 

संबंधित बातम्या:

चित्रा वाघ यांच्या पतीचं काय आहे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण?; वाचा सविस्तर रिपोर्ट

मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास : चित्रा वाघ

संजय राठोड यांचे घटनेच्या दिवशी पूजाला 45 फोन, अरुण राठोडची 101वरून कबुली; चित्रा वाघ यांचा दावा

चित्रा वाघ यांचा संजय राठोडांसोबत मॉर्फ फोटो, आक्षेपार्ह फोटोवरुन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार

(acb filed a case against chitra wagh husband kishor wagh)