चित्रा वाघ यांचा संजय राठोडांसोबत मॉर्फ फोटो, आक्षेपार्ह फोटोवरुन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार

तसेच चित्रा वाघ यांनी त्या फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:29 PM, 26 Feb 2021
चित्रा वाघ यांचा संजय राठोडांसोबत मॉर्फ फोटो, आक्षेपार्ह फोटोवरुन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार
Chitra Wagh Morph Photo

मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ सातत्याने आवाज उठवत आहेत. संजय राठोड यांचं नाव घेत त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचेच मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडालीय. त्या फोटोमध्ये चित्रा वाघ आणि संजय राठोड एकदम जवळ उभे असून, एकत्र दिसत आहेत. चित्रा वाघ यांनी आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केलीय. टीव्ही 9 मराठीकडे चित्रा वाघ यांनी उद्विग्नता व्यक्त केलीय. तसेच चित्रा वाघ यांनी त्या फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही यासंदर्भात चित्रा वाघ यांनी कल्पना दिलेली आहे. (Chitra Wagh Morph Photo With Sanjay Rathod, Complaint To CM And Home Minister Over Offensive Photo)

महाराष्ट्रात अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं आता गुन्हाः चित्रा वाघ

महाराष्ट्रात अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं आता गुन्हा झालाय काय, असं मला विचारायचं आहे. जे काम पोलिसांचं आहे, ते पोलिसांनी केलं असतं, जे काम सरकारचं आहे, ते काम सरकारनं केलं असतं. तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची काय गरज होती, असंही चित्रा वाघ म्हणाल्यात. स्वतः काही करायचं नाही आणि अशा पद्धतीनं फौज उभी करायची. हे जे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केले जात आहेत, नेमकं तुम्ही काय सिद्धू करण्याचा प्रयत्न करताय, असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय.

त्या फोटोंचे स्क्रीन शॉर्ट काढून मी डीजींपासून अनेकांना पाठवतेयः चित्रा वाघ

त्या फोटोंचे स्क्रीन शॉर्ट काढून मी डीजींपासून अनेकांना पाठवतेय. मी मुंबईच्या बाहेर आहे म्हणून गुन्हा दाखल होणार नाही. तोपर्यंत मी हे सर्व सहन करत बसायचं काय?, मी जिथे अन्याय झाला तिथे आवाज उठवतेय हा माझा गुन्हा आहे काय?. मला मुख्यमंत्र्यांपासून कोणाचाही कॉल आलेला नाही. मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी बोलणं झालं आहे, अशी माहितीही चित्रा वाघ यांनी दिलीय.

तोपर्यंत मला हे सगळं सहन करावं लागणारः चित्रा वाघ

डीजी साहेबांच्या मी संपर्कात आहे. जोपर्यंत मी स्वतः जाऊन एफआयआर करत नाही, तोपर्यंत होणार नाही. तोपर्यंत मला हे सगळं सहन करावं लागणार आहे. मला काही करू देत नाहीयेत. जे माझ्या ओळखीचे नंबर नाहीत, त्यांचे मी फोनच घेत नाहीये, असंही त्या म्हणाल्यात.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा हाच फोटो मॉर्फ करण्यात आला आहे, चित्रा वाघ यांच्या नवऱ्याच्या ठिकाणी संजय राठोड यांचा फोटो लावण्यात आलाय. परंतु चित्रा वाघ यांचा आदर राखत असल्यानं आम्ही त्यांचा मॉर्फ  केलेला फोटो दाखवत नाही. 

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास : चित्रा वाघ

संजय राठोड यांचे घटनेच्या दिवशी पूजाला 45 फोन, अरुण राठोडची 101वरून कबुली; चित्रा वाघ यांचा दावा

Chitra Wagh Morph Photo With Sanjay Rathod, Complaint To CM And Home Minister Over Offensive Photo