संजय राठोड यांचे घटनेच्या दिवशी पूजाला 45 फोन, अरुण राठोडची 101वरून कबुली; चित्रा वाघ यांचा दावा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला आहे. (Maharashtra govt shielding minister linked to woman's death: Chitra Wagh)

संजय राठोड यांचे घटनेच्या दिवशी पूजाला 45 फोन, अरुण राठोडची 101वरून कबुली; चित्रा वाघ यांचा दावा
चित्रा वाघ, भाजप नेत्या
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 2:06 PM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्या दिवशी वन मंत्री संजय राठोड यांनी पूजाला 45 फोन केले होते. अरुण राठोडने पोलिसांच्या 101 या क्रमांकावरून तशी कबुलीही दिली होती, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच त्या दिवशी 101 क्रमांकावरून झालेलं अरुण राठोडचं संभाषण जाहीर करून त्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Maharashtra govt shielding minister linked to woman’s death: Chitra Wagh)

चित्रा वाघ यांनी पुण्यात जाऊन पूजा चव्हाणने आत्महत्या केलेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसोबत चर्चाही केली. आज त्यांनी मीडियाशी संवाद साधताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील अरुण राठोडने पोलिसांच्या 101 क्रमांकावर फोन करून पोलिसांकडे कबुली दिली आहे. आत्महत्येच्या दिवशीच त्यानेही कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या कॉल रेकॉर्डची चौकशी करावी, पण पोलीस हे संपूर्ण प्रकरण झाकायचं काम करत आहे, असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला.

पवार-ठाकरेंकडून अपेक्षा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आता तरी त्यांनी या हत्याराला मंत्रिमंडळातून बाजूला करावं. आमचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यांना जर पुरावे दिले तर ते नक्कीच न्याय देतील. राजकारण बाजूला ठेवा. बाकी कोणाकडूनच आमची अपेक्षा नाही. बाकी चट्टेबट्टे सारखेच आहे. मुख्यमंत्री म्हणून महिलांच्या बाबतीत तुमची प्रतिमा स्वच्छ आहे, त्यामुळे तुमच्याकडून आमच्या भरपूर अपेक्षा आहेत, असंही त्या म्हणाल्या.

कारवाई व्हावी

पूजा चव्हाण प्रकरणावर भाजप नेते विनोद तावडे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांवर असे आरोप होतात. त्यावेळी नेतृत्वाने अतिशय संवेदनशीलपणे असायला हवं. कारण या गोष्टी लोकांच्या मनावर परिणाम करत असतात.असं असताना मुख्यमंत्री असतील किंवा पवार साहेब असतील अशा जबाबदार व्यक्तींकडून कारवाईची कृती सामान्य माणसाला अपेक्षित आहे, असं विनोद तावडे म्हणाले. सर्वसामान्य माणसाला आज राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल अस मला वाटतं, असं तावडे म्हणाले.

राठोडांचा राजीनामा घ्यावाच लागेल : प्रवीण दरेकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. पूजा चव्हाण यांची आत्महत्या किंवा हत्या झाली आहे याची चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात अनेक क्लिप, फोटो दस्तावेज उपलब्ध आहे,साक्षीदार आहे. चौकशी होत नाही म्हणून सरकारवर दबाव भाजपा आणत आहे. महाराष्ट्रातील जनता संतप्त आहे. समाजाच्या दबावाला बळी न पडता एक राज्यशासक म्हणून ठाकरे बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाती घेतला पाहिजे. भारतीय जनता पार्टी आक्रमक आहे. पूजा चव्हाण मृत्यूचा छडा लावल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. संशयाची सुई संजय राठोड यांच्यावर आहे त्यामुळे राजीनामा घ्यावा. निर्दोषत्व झाल्यास मंत्री पदावर संजय राठोड यांना पुन्हा आणावे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. (Maharashtra govt shielding minister linked to woman’s death: Chitra Wagh)

संबंधित बातम्या:

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, भाजप आक्रमक

छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत, पूजा चव्हाण प्रकरणावर ते का बोलत नाही, फडणवीस भडकले

‘मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोना कोरोना’, फडणवीसांकडून ठाकरे सरकारची खिल्ली 

(Maharashtra govt shielding minister linked to woman’s death: Chitra Wagh)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.