Ichalkaranji Mocca : इचलकरंजी शहरातील जर्मनी गॅंगवर पाचव्यांदा मोक्का, व्यापाऱ्याकडे खंडणी मागितल्याने शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई

| Updated on: Aug 07, 2022 | 5:04 PM

पुन्हा जर्मनी टोळीतील आनंद जर्मनी व यातील चार सदस्यांनी रफिक नांद्रेकर यांच्याकडे खंडणी मागितली. याप्रकरणी नांद्रेकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला.

Ichalkaranji Mocca : इचलकरंजी शहरातील जर्मनी गॅंगवर पाचव्यांदा मोक्का, व्यापाऱ्याकडे खंडणी मागितल्याने शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई
सांगलीत बडोदा बँकेची 16 कोटीं 97 लाखाची फसवणूक
Image Credit source: tv9
Follow us on

इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील जर्मनी गॅंग (Germany Gang)वर पोलिसांनी पाचव्यांदा मोक्का (Mocca) लावला आहे. त्यामुळे शहरातील संघटित गुन्हेगारीवर चांगलाच वचक बसला आहे. जर्मनी टोळीतील आनंद जर्मनी व त्याच्या अन्य साथीदारांनी एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली होती. पोलिसांनी यासंदर्भात मोक्काचा प्रस्ताव पोलिसांनी पाठवला होता, या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. जर्मनी टोळीतील आनंद जर्मनी व यातील चार सदस्यांनी व्यापारी रफिक नांद्रेकर यांच्याकडे खंडणी मागितली. याप्रकरणी नांद्रेकर यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, डीवायएसपी गणेश बिराजदार, डीवायएसपी कृष्णत पिंगळे यांनी शहरातील सुमारे 18 वेळा मोक्कांतर्गत कारवाई करून 218 आरोपींना गजाआड केले होते. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी कमी झाली होती. पण शहरातील असणाऱ्या जवाहर नगर परिसरातील जर्मनी टोळीने पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी जर्मनी टोळीतील आनंद जर्मनी याला मोक्कांतर्गत जामीन मिळाला होता.

जामीन मिळाल्यानंतर जर्मनी टोळीने पुन्हा डोके वर काढले

पुन्हा जर्मनी टोळीतील आनंद जर्मनी व यातील चार सदस्यांनी रफिक नांद्रेकर यांच्याकडे खंडणी मागितली. याप्रकरणी नांद्रेकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन यातील आनंद जर्मनी, प्रविण मगदूम, शुभम पटणकोडी, शिवा शिंदे, अमोल लोले या सर्वांना शिवाजीनगर पोलिसांनी खंडणीप्रकरणी अटक करून पुन्हा हजर करून न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी पुन्हा पाचव्यांदा मोक्का कारवाई केली आहे. तसेच पोलीस महासंचालक मनिष लुलिया आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे इचलकरंजी पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. जर्मनी टोळीवर पुन्हा मोक्काअंतर्गत कारवाई केल्यामुळे शहरातील अन्य टोळ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

जर्मनी टोळीला कारागृहातून मदत करणारा गरड पोळीचा रामा गरड याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. यानुषंगाने यांच्यावरील कारवाई करण्यात आली होती. तसेच जर्मनीतील मोरक्या अशोक खंडागळे, आदर्श जर्मनी यांनी कारागृहातून जामीन मिळण्यासाठी खंडणी मागितली होती. त्या अनुषंगाने यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. त्या अगोदर जर्मनी टोळीवर खून, मारामारी, खंडणी मागणे यासारखे गंभीर स्वरूपाचे विविध प्रकारचे गुन्हे विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल आहेत. (Action under Mokka for the fifth time against Germany gang in Ichalkaranji city)