Court: फॅमिली कोर्टात कौन्सिंलिंगनंतर बाहेर पडला आणि कापला पत्नीचा गळा, कोर्टाच्या आवारातच घडला प्रकार, मुलावरही हल्ला

थट्टेकेरे गावातील चैत्रा हिचा विवाह सात वर्षांपूर्वी शिवकुमार याच्याशी झाला होता. काही वर्षांनी दोघांमध्ये सातत्याने वाद होऊ लागले, संबंध ताणले गेले. त्यामुळे घटस्फोटासाठी या दोघांनीही अर्ज दाखल केला. शनिवारी त्यांची दिलजमाई घडवून आणण्यासाठी त्यांना कोर्टात बोलावले होते.

Court: फॅमिली कोर्टात कौन्सिंलिंगनंतर बाहेर पडला आणि कापला पत्नीचा गळा, कोर्टाच्या आवारातच घडला प्रकार, मुलावरही हल्ला
कौन्सिलिंगनंतर कोर्टाच्या आवारात पत्नीची हत्या
Image Credit source: social media
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Aug 14, 2022 | 9:16 PM

बंगळुरु – कोर्टाच्या परिसरातच एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा (cut wife throat)कापून हत्या केल्याची धकाकादायक घटना घडली आहे. फॅमिली कोर्टात (family court) या दोघांनाही कौन्सिलिंगसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाच्या आवारातच ही घटना घडली आहे. कर्नाटकातील हसन (Hasan, Karnataka)जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. यावेळी या व्यक्तीने बायकोची हत्या तर केलीच. तसेच तिच्यासोबत असलेल्या लहान मुलावरही त्याने हल्ला केला. सुदैवाने आजूबाजूचे लोकं धावले म्हमून या लहान मुलाचा जीव वाचला आहे.विशेष म्हणजे हत्येच्या काही क्षणांपूर्वी फॅमिली कोर्टात या दाम्पत्याने सात वर्षांचे आपले लग्न टिकवण्याचा निर्णय घेतला होता.

नेमका काय होते प्रकरण

थट्टेकेरे गावातील चैत्रा हिचा विवाह सात वर्षांपूर्वी शिवकुमार याच्याशी झाला होता. काही वर्षांनी दोघांमध्ये सातत्याने वाद होऊ लागले, संबंध ताणले गेले. त्यामुळे घटस्फोटासाठी या दोघांनीही अर्ज दाखल केला. शनिवारी त्यांची दिलजमाई घडवून आणण्यासाठी त्यांना कोर्टात बोलावले होते. विशेष म्हणजे हत्येच्या काही क्षणांपूर्वी फॅमिली कोर्टात या दोघांनीही सात वर्षांचे आपले लग्न टिकवण्याचा निर्णय घेतला होता. आपआपसातील मतभेद संपवून पुन्हा एकदा नव्याने संसार करण्यासाठी ते दोघेही तयार झाले होते.

कोर्टाच्या वॉशरुममध्ये केला हल्ला

हसन जिल्ह्यातील होलेनरसीपुरा फॅमिली कोर्टात या दोघांचे एक तास कौन्सिलिंग करण्यात आले. त्यात दोघांनी पुन्हा संसार करण्याचे ठरवल्यानंतर हे दोघेही बाहेर प़डले. चैत्रा जेव्हा बाहेर पडली तेव्हा पाठीमागे शिवकुमारही वॉशरुमपर्यंत गेला. धारदार हत्याराने त्याने चैत्राचा कळा कापला. या हल्ल्यानंतर तिच्या गळ्यातून खूप रक्त वाहिले. त्यानंतर त्याने मुलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात सुदैवाने लहान मुल बचावले. हत्या केल्यानंतर शिवकुमार तिथून पळून जाण्याचया प्रयत्नात होता. मात्र आजूबाजूला असलेल्यांनी त्याला पकडले

हे सुद्धा वाचा

आरोपी शिवकुमार अटकेत

ही घटना कोर्टाच्या परिसरातच घडल्याची माहिती हसनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रहीराम यांनी दिली आहे. त्यानंतर शिवकुमार याला अटक करुन त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहेत. त्याच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कौन्सिलिंगनंतर या दोघांमध्ये काय झाले याचा तपास आता करण्यात येतो आहे. कोर्टात त्याला धारदार हत्यार मिळाले कसे, ही ठरवून केलेली हत्या होती का, या अंगलनेही आता पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. काही मिनिटांपूर्वी पुन्हा संसार सुरु करण्याच्या तयारीत असलेला शिवकुमार काही क्षणांनंतर इतका नराधम कसा झाला, असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें