Abhishek Ghosalkar | अभिषेक घोसाळकरांवरील फायरींगनंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Abhishek Ghosalkar | फेसबुक लाइव्ह केल्यानंतर मॉरिसने अभिषेक यांच्यावर अचानक हा गोळीबार केला. मॉरिसने आधीच कट रचला होता. त्याने पद्धतशीरपणे प्लानिंग करुन ही हत्या केली. या घटनेनंतर महाराष्ट्राचा बिहार झालाय का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Abhishek Ghosalkar | अभिषेक घोसाळकरांवरील फायरींगनंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Abhishek Ghosalkar death in Firing
| Updated on: Feb 09, 2024 | 9:09 AM

मुंबई, (गिरीश गायकवाड) | ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी हत्या झाली. ते शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते. मॉरिस नावाच्या एका स्थानिक गुंडाने अभिषेक यांच्यावर अचानक जवळून गोळ्या झाडल्या. अभिषेक घोसाळकर यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. अभिषेक यांच्यावर फायरिंग केल्यानंतर मॉरिसने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. हा सगळाच प्रकार खूपच धक्कादायक आहे. याच व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर आलय. फेसबुक लाइव्ह केल्यानंतर मॉरिसने अभिषेक यांच्यावर अचानक हा गोळीबार केला. मॉरिसने आधीच कट रचला होता. त्याने पद्धतशीरपणे प्लानिंग करुन ही हत्या केली. या घटनेनंतर महाराष्ट्राचा बिहार झालाय का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्याावर गोळीबार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कारण या घटनेनंतर राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलीय का? हा प्रश्न विचारलं जाणं स्वाभाविक आहे. मागच्याच आठवड्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. या खूप गंभीर घटना आहेत. त्यामुळे सरकारला असे प्रकार रोखण्यासाठी ठोस पावल उचलावी लागतील. त्या संदर्भातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

बैठकीत काय चर्चा ?

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. परवानाधारक शस्त्रांच दुरुपयोग होताना दिसतोय. ज्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे, त्यांना बोलवण्यात येईल, त्यांची चौकशी होईल, असा निर्णय या बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कारण अशा घटनांमुळे विरोधकांना आयत कोलीत मिळतय. याला उत्तर कसं द्यायच? याची चर्चा झाली. ठोस उपयोजना केल्या जातील.