AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅमेरा, लेखणी ते चाकू, रेखा जरे हत्याकांडातील बाळ बोठे जातेगावच्या घाटात व्हिलन कसा झाला?

पत्रकार, एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राचा वृत्तसंपादक ते सुपारी किंग आणि आता बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळा बोठे असा त्याचा प्रवास आहे (Rekha Jare Murder Accuse Bala Bothe)

कॅमेरा, लेखणी ते चाकू, रेखा जरे हत्याकांडातील बाळ बोठे जातेगावच्या घाटात व्हिलन कसा झाला?
रेखा जरे बाळ बोठे
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 13, 2021 | 10:29 AM
Share

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे त्याला हैदराबादमधून ताब्यात घेतले. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता. ज्या जातेगावच्या घाटात त्याने हे हत्याकांड घडवल्याचा आरोप आहे, त्या जातेगावच्या घाटाशी त्याचा आधीपासून काय संबंध होता? हे वाचणं रंजक ठरणार आहे. (Ahmednagar Crime Rekha Jare Murder case Main Accuse Who is Bala Bothe)

पत्रकार, एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राचा वृत्तसंपादक ते सुपारी किंग आणि आता बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळा बोठे… अहमदनगर जिल्ह्यातील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या रेखा जरे हत्याकांडात सुपारी दिल्याचा आरोप बाळा बोठेवर आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या असलेल्या रेखा जरेंची नगर-पुणे रोडवरील जातेगावच्या घाटात हत्या करण्यात आली. या हत्याकांडाची सुपारी बाळा बाठेनेच दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं.

काय होती घटना?

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेल्या रुणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने 5 आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला.

कॅमेरा गेला लेखणी आली

अहमदनगरपासून अवघ्या 17 किलोमीटरवर असणाऱ्या वाळकी इथे बाळा बोठे लहानाचा मोठा झाला. कॉलेज शिक्षणानंतर त्याला फोटोग्राफीचा छंद जडला आणि तो फोटोग्राफी करु लागला. काही फोटो वर्तमानपत्रातही येऊ लागले. त्यातच अहमदनगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर यांच्याशी त्याची ओळख झाली. बाळा बोठेतील धडपडेपणा पाहून मिरीकरांनी त्याला पत्रकारितेत आणलं आणि कॅमेरा जाऊन लेखणी हाती आली.

…आणि बाळा बोठे हिरो झाला

शहरातील एका नामांकित वर्तमानपत्रात गुन्हेगारीचं वार्तांकन बाळा बोठे करु लागला. त्यामुळे पोलिसांशी जवळचा संबंध आला. गुन्हेगारी विश्व कसं आहे? त्यातील खाचाखोचांची माहिती बाळा बोठेला मिळू लागली. हेच करता करता तो शोध पत्रकारितेकडे आला आणि गुन्हेगारी विश्वात शोध पत्रकारितेची धार त्याने आजमावली. त्यात जातेगावच्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या घाटवाडीत अवैधपणे गावठी दारु बनवणं सुरु असल्याचा त्याला समजलं. लेखणीच्या धारेचा वापर त्याने हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी केला. ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली आणि जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या अल्कोहोल निर्मितीत शहरातील अनेक नामांकित लोकांची नावं पुढे आली. इथूनच बाळ बोठे हिरो झाला.

एकतर्फी प्रेमातून तरुणीचे आरोप

याच प्रकरणानंतर बाळा बोठेने जीविताला धोका असल्याचं सांगितलं. आणि पोलीस संरक्षणाची मागणी केली. बोठेसोबत 24 तास सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली. शहरातील लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत बोठेची तगडी ओळख झाली. त्यातच एका तरुणीनं बाळा बोठेवर एकतर्फी प्रेम प्रकरणातून धमकावण्याचे आरोप केले आणि बोठेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हेही प्रकरण शहरात चांगलंच गाजलं, मात्र या प्रकरणात बाळा बोठे निर्दोष सुटला. त्यानंतर बाळा बोठेच्या प्रगतीचा आलेख सरळ वरच्या दिशेनं राहिला.

1997 ला बाळ बोठेचं लग्न झालं. या लग्नात शहरातील सगळे उच्चपदस्थ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हजर होते. या लग्नाची चर्चाही शहरात रंगली होती. याच काळात अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रात मोठ्या पदांवर मजल मारली.

बाळा बोठेने आतापर्यंत काय काय केलं, हे पाहिल्यावर त्याच्या प्रतिष्ठेची जाणीव तुम्हाला होईल!

तब्बल 28 वर्ष पत्रकारिता

8 पुस्तकं प्रकाशित, 3 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर

नगर जिल्ह्याच्या राजकारणावर पीएचडी

तब्बल 16 विषयांमध्ये मास्टर्स डिग्री

राज्य, राष्ट्रीय पातळीवरचे 40 पुरस्कार

बाळ बोठे 40 हून अधिक देश फिरला, आलिशान बंगला, जमीन जुमला आणि महागड्या गाड्या

बाळ बोठेनं हे इतक्या लवकर कसं मिळवलं असा प्रश्न आता अनेकांना पडतोय…

(Ahmednagar Crime Rekha Jare Murder case Main Accuse Who is Bala Bothe)

हनी ट्रॅप आणि समझोता

गेल्या काही महिन्यांपूर्वी बोठे यांनी हनी ट्रॅपची मालिका वृत्तपत्रात सुरु केली होती. त्यातून अनेक मोठमोठ्या राजकीय, सामाजिक, व्यापारी व्यक्तींची नावे समोर आली होती. मात्र ही नावे छापताना त्या व्यक्तीचे नाव कोडमध्ये छापले जायचे, जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचवला जाईल आणि नंतर समझोता करता येईल. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की, यासंदर्भात बोठे याला याची माहिती कशी मिळत होती आणि यासंदर्भातील ते मालिका कसे छापत होते, त्यांचा तर या हत्याकांडात काही संबंध नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तर शहरात याच्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

आताही बाळा बोठे साडेतीन महिने पोलिसांना चकवा देत होता. तो जिथे असल्याची माहिती मिळायची, तिथे छापा टाकल्यावर काहीही सापडत नसे. अगदी खबरीही पोलिसांना गुंगारा देत असल्याचं दबक्या आवाजात बोललं जाई. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील रेखा जरे हत्याकांड किती गुंतागुंतीचं आहे, याचा प्रत्य येत होता.

संबंधित बातम्या :

रेखा जरे हत्या प्रकरणाचा सूत्रधार सापडला, बाळ बोठेला हैदराबादमध्ये बेड्या

रेखा जरे हत्याकांडात बोठे आणि हनी ट्रॅपची जोरदार चर्चा; काय आहे नेमकं प्रकरण?

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं ‘मटेरियल’ वाचलंत?

(Ahmednagar Crime Rekha Jare Murder case Main Accuse Who is Bala Bothe)

Follow Us
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर