संजय बियाणी हत्याकांडांची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा नियमित आढावा घेणार

| Updated on: Apr 07, 2022 | 11:03 PM

संजय बियाणी यांचे मारेकरी व या हत्याकांडाचे सूत्रधार लवकरात लवकर गजाआड करण्यासाठी गृहमंत्री या नात्याने आपण या तपासाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, अशी मागणी मंत्री चव्हाण यांनी याप्रसंगी केली. गृहमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

संजय बियाणी हत्याकांडांची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा नियमित आढावा घेणार
संजय बियाणी हत्याकांडातील 9 आरोपींवर मोक्का
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्याकांडाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या हत्या प्रकरणी गठीत झालेल्या विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा ते नियमित आढावा घेणार आहेत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री अशोक चव्हाण यांची गुरुवारी दुपारी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी अशोक चव्हाण यांनी बियाणी हत्याकांडाचा घटनाक्रम तसेच बियाणी कुटुंबियांसोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. तसेच गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा आढावा घेतला. (Ashok Chavan meets Home Minister Dilip Walse Patil in Sanjay Biyani murder case)

हत्येचा लवकरात लवकर उलगडा झाला पाहिजे

संजय बियाणी यांचे मारेकरी व या हत्याकांडाचे सूत्रधार लवकरात लवकर गजाआड करण्यासाठी गृहमंत्री या नात्याने आपण या तपासाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, अशी मागणी मंत्री चव्हाण यांनी याप्रसंगी केली. गृहमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. संजय बियाणी यांची हत्या अतिशय गंभीर असून, त्यांचे मारेकरी कोण व या हत्येचा हेतू काय? याचा लवकरात लवकर उलगडा झाला पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

खासदार चिखलीकर यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट

नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येचा तपास केंद्रीय उच्चस्तरीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून करून संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना आणि सूत्रधारास तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निवेदन दिले. माहेश्वरी समाजाच्या वतीने देण्यात आलेले निवेदनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्यक्ष भेटून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयात देण्यात आले आहे. (Ashok Chavan meets Home Minister Dilip Walse Patil in Sanjay Biyani murder case)

इतर बातम्या

VIDEO : चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन गाडीखाली आल्याने प्रवाशाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

पत्नीचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाल्यानं पतीचा डॉक्टरवर प्राणघातक हल्ला! राजगुरुनगरमधील रुग्णालयात नातलगांची तोडफोड