AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेडिकलमध्ये चालला होता तरुण, वाटेत मित्रांचे कुणासोबत भांडण सुरु होते; मध्यस्थी करायला गेला अन्…

मानपाडा येथील तरुण रात्रीच्या सुमारास मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी चालला होता. यावेळी रस्त्यात त्याला त्याच्या मित्रांशी कुणीतरी भांडत असल्याचे दिसले. तरुण मध्यस्थी करायला गेला.

मेडिकलमध्ये चालला होता तरुण, वाटेत मित्रांचे कुणासोबत भांडण सुरु होते; मध्यस्थी करायला गेला अन्...
डोंबिवलीत मित्रांचे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर हल्लाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 28, 2023 | 10:19 AM
Share

डोंबिवली / सुनील जाधव : मित्रांचे भांडण सोडवायला जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. भांडण सोडवायला आलेल्या 29 वर्षीय तरुणावरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवली मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिर परिसरात ही घटना घडली. विजय आवटे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून, यात तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मेडिकलमध्ये चालला होता तरुण

डोंबिवली पूर्वेत राहणारा विजय आवटे हा शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिर जवळील मेडिकलमध्ये गोळी आणण्यासाठी गेला होता. यादरम्यान त्याठिकाणी त्याने त्याच्या सुयोग आणि सचिन नावाच्या मित्रांचे काही लोकांबरोबर भांडण सुरू असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. विजयने त्या ठिकाणी जाऊन मध्यस्थी करत मित्रांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला.

मध्यस्थी करायला गेला म्हणून हल्ला

याचाच राग मनात धरून विजयला एका टोळीतील 5 तरुणांनी मिळून धमकी देत लाथा-बुक्यांनी मारहाण केली. यानंतक विजयवर चाकूने सपासप वार केले. या मारहाणीत विजय हा गंभीर जखमी झाला आहे. विजयवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर यात तीन आरोपी अजूनही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान