प्रियकरासाठी डॉक्टर पतीला दिलं भुलीचे इंजेक्शन, आणि नंतर पोलीस ठाण्यात…

पोलिसांच्या माहितीनुसार पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण डॉक्टर पतीला आल्याने तिने पतीला जीवे ठार मारण्याचा प्लॅन आखला होता.

प्रियकरासाठी डॉक्टर पतीला दिलं भुलीचे इंजेक्शन, आणि नंतर पोलीस ठाण्यात...
Image Credit source: Google
| Updated on: Sep 27, 2022 | 2:58 PM

नाशिक : डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकमध्ये ( Nashik Crime) घडलीय. नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्याने हि खबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाची कुणकुण पतीला लागल्याने थेट जीवे मारण्याचा प्रयत्नच पत्नीने केल्याचे समोर आले आहेत. 45 वर्षीय डॉक्टर पती आणि पत्नी 40 वर्षीय असल्याने या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे याबाबत पीडित डॉक्टर (Doctor) पतीच्या मुलानं म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. एका खासगी रुग्णालयात प्रियकराच्या (wife lover) मदतीने पतीसोबत वाद घालत एका खोलीत डांबून ठेवत भुलीचे इंजेक्शन दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित डॉक्टर पतीच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरु केला आहे.

या प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी अजून अटक केली नसून तपास सुरु असल्याची माहिती दिली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण डॉक्टर पतीला आल्याने तिने पतीला जीवे ठार मारण्याचा प्लॅन आखला होता.

पीडित डॉक्टरला एका खाजगी रुग्णालयात बोलावून प्रियकराच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्त्न केला होता.

एकूणच या घटनेची माहिती फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांच्या दप्तरी नोंद होणारी असली तरी वैद्यकीय क्षेत्रात याबद्दल मोठी चर्चा आहे.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने आता म्हसरूळ पोलीस काय तपास करतात ? तपासात आणखी काही बाबी समोर येतात का ? पतीला जीवे मारण्यामागे काही आणखी वेगळा हेतू होता का ? याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे.