AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trump warns Iran : इराणने जर असे…केले तर त्यांच्यावर २० पट अधिक हल्ला करु, ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प यांनी इराणशी चर्चेचे मार्ग सुरु ठेवले आहेत असे सांगितले.मात्र इराणने जर पावले मागे घेतली नाही तर त्यांच्यावर याच्याहून २० पट मोठा हल्ला करु अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.

Trump warns Iran : इराणने जर असे...केले तर त्यांच्यावर २० पट अधिक हल्ला करु, ट्रम्प यांचा इशारा
Iran war impact
| Updated on: Mar 10, 2026 | 6:59 PM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा शेखी मिरवली आहे. इराणवरील हल्ल्याचे क्रेडिट घेताना ते म्हणाले की दुसऱ्या कोणा प्रेसिडेंटकडे हे करण्याची हिंमत नाही. मला असा अध्यक्ष नको ज्याच्याकडे पाच वर्षे किंवा दहा वर्षातही हिंमत पैदा होत नसेल. ट्रम्प यांनी यावेळी इराणचे नेते मोजतबा खामेनेई यांना धमकावत म्हटले की तो देखील शांत राहू शकतो.

ट्रम्प यांनी आज इराणची फायर, फ्युरी आणि डेथचा इशारा दिला होता. युद्धाच्या ११ व्या दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मोजतबा खामेनेई यांच्या इराणच्या सर्वोच्च पदी नेमल्याने आपण खूश नसल्याचेही म्हटले आहे. ट्रम्प यांनी हे संकेतही दिले की ते इराणशी थेट बोलू शकतात. फॉक्स न्यूजशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की हे शक्य आहे की मी इराणशी स्वत: बोलेन.ते पुढे म्हणाले की ऑपरेशन एपिक फ्युरीचे निकाल अपेक्षेपेक्षा अधिक जास्त आहे.

सर्वात जास्त आश्चर्य तेव्हा वाटले –

अमेरिकेल्या सैनिक कारवावर इराणने दिलेल्या प्रत्युत्तरा संदर्भात ट्रम्प म्हणाले की इराणचे प्रत्युत्तर पाहून मला आश्चर्य वाटले की त्यांनी त्या देशांवरही हल्ले केले ज्यांनी त्यांच्यावर हल्ले केले नाहीत. ट्रम्प म्हणाले जेव्हा आम्ही त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्यांचे ५० टक्के मिसाईल संपवून टाकले. जर आम्ही असे केले नसते तर हे युद्ध अवघड बनले असते. ट्रम्प यांनी शेखी मारत सांगितले की कोणा अध्यक्षात असे करण्याची हिंमत नव्हती. मी असा कोणताही अध्यक्ष पाहू इच्छित नाही जो पाच वा दहा वर्षात अशी हिंमत दाखवू शकत नाही.

युद्ध संपवण्यावर ट्रम्प यांचा जोर –

इराणशी युद्धाचा कालावधी कमी वेळेचा होऊ शकतो. मात्र युद्धाचा कालावधी वाढू देखील शकतो. मात्र, जर इराणने जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा आणला तर युद्ध वाढू शकते असेही ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांनी मियामीच्या जवळ आपल्या गोल्फ क्लबमध्ये रिपब्लिकन खासदारांशी बोलताना सांगितले की आम्ही काई वाईट लोकांपासून सुटका मिळवण्यासाठी मध्य पूर्वेत एक छोटी सैर केली होती. आता मला वाटते तुम्ही पाहाल ही एक शॉर्ट सहल होणार आहे. काही तासांनी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली की जर इराण असे काही करत असेल ज्याने होर्मुज स्ट्रेटमध्ये तेलाचा फ्लो थांबेल तर अमेरिका त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांपेक्षा २० पट मोठा हल्ला करेल.

इराणच्या सरकारी मीडियात प्रसिद्ध झालेल्या ट्रम्प यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना इराणच्या IRGC चे प्रवक्ते अली मोहम्मद नॅनी यांनी सांगितले की इराणच आता निश्चित करेल युद्ध कधी संपेल. याच दरम्यान ट्रम्प यांनी जागतिक तेल बाजारातील तेल पुरवठा स्थिर करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या दीर्घ चर्चा केली आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट