VIDEO | शेतीच्या वादातून तुफान राडा, दोन शेतकऱ्यांमध्ये शेतातच हाणामारी

शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये तुफान मारामारी झाली. दोन शेतकरी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एक शेतकरी जखमी झाला.

VIDEO | शेतीच्या वादातून तुफान राडा, दोन शेतकऱ्यांमध्ये शेतातच हाणामारी
औरंगाबाद शेतकऱ्यांच्या दोन गटात हाणामारी
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 8:48 AM

औरंगाबाद : शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हाणामारीत एक शेतकरी जखमी झाल्याची माहिती आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल गावात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. (Aurangabad Farmers Group Fight)

नेमकं काय घडलं?

शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये तुफान मारामारी झाली. दोन शेतकरी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या
हाणामारीत एक शेतकरी जखमी झाला. जगदीशकुमार कुंटे असं मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. फुलंब्री पोलिसांनी अजूनही घटनेची दखल घेतली नसल्याची माहिती आहे.

पाहा व्हिडीओ :

औरंगाबादमध्ये याआधीही शेतकऱ्यांचा राडा

औरंगाबाद जिल्ह्यातील नागद गावात याआधीही असाच प्रकार घडला होता. गावात शेतकऱ्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये दोन गटातील लोक एकमेकांना चांगलेच मारहाण करत असल्याचे दिसत होते. हे लोक लाठ्या-काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत असल्याचे पाहायला मिळाले.

लोखंडी गेटचीही तोडोफड

रस्त्याच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. या मारहाणीमध्ये डॉक्टर दिलीपसिंग राजपूत यांच्या शेतातीतल लोखंडी गेटचीसुद्धा तोडफोड करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

VIDEO | मनोरुग्ण मुलाची पालकांना अमानुष मारहाण, आईचा मृत्यू, व्हिडीओ काढण्यात बघे दंग

औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या दोन गटात तुफान राडा, लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल