VIDEO | मनोरुग्ण मुलाची पालकांना अमानुष मारहाण, आईचा मृत्यू, व्हिडीओ काढण्यात बघे दंग

शनिवारी सायंकाळी या मुलाने वृद्धांना अमानुष मारहाण केली. रात्री त्यांना अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वृद्ध आईचा मृत्यू झाला तर वडील कोमात आहेत

VIDEO | मनोरुग्ण मुलाची पालकांना अमानुष मारहाण, आईचा मृत्यू, व्हिडीओ काढण्यात बघे दंग
बीड वृद्धांना मुलाकडून मारहाण

बीड : आई वडिलांना मुलानेच अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ बीडमधून समोर आला आहे. मानसिक रुग्ण असलेल्या मुलाने काठी आणि दगडाने वयोवृद्ध पालकांना मारहाण केली. दुर्दैव म्हणजे वृद्ध दाम्पत्य मदतीसाठी याचना करत असतानाही त्यांना वाचवण्याऐवजी गावातील रहिवासी मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते. या अमानुष मारहाणीनंतर अखेर वृद्ध आईने प्राण सोडला. तर वडील गंभीर आहेत. (Beed Son beaten up parents mother dies locals busy shooting video)

बीडमधील दाम्पत्याला मुलाकडून मारहाण

घटना बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील घटशीळ पारगाव येथे शनिवारी सायंकाळी घडली. त्र्यंबक खेडकर आणि शिवबाई खेडकर हे गावातच राहतात. त्यांना बाबासाहेब नावाचा मुलगा आहे. तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे.

आईचा मृत्यू, वडील कोमात

शनिवारी सायंकाळी या मुलाने वृद्धांना अमानुष मारहाण केली. रात्री त्यांना अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वृद्ध आईचा मृत्यू झाला तर वडील कोमात आहेत. या प्रकरणी अद्याप कसलीही नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही.

व्हिडीओ काढण्यात बघे दंग

मारहाण होत असताना वृद्ध दाम्पत्य मदतीची याचना करत होते, यावेळी मदत मिळाली असती तर वृद्धेला जीव गमवावा लागला नसता. मात्र ग्रामस्थ मदतीऐवजी व्हिडीओ काढत बसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO : पोलीसही माणूस, त्याला इतकी निघृणपणे मारहाण का? दोन महिला, सहा पुरुषांचं अमानुष कृत्य, व्हिडीओ व्हायरल

औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या दोन गटात तुफान राडा, लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

(Beed Son beaten up parents mother dies locals busy shooting video)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI