VIDEO : पोलीसही माणूस, त्याला इतकी निघृणपणे मारहाण का? दोन महिला, सहा पुरुषांचं अमानुष कृत्य, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका पोलिसाला जमावाकडून प्रचंड मारहाण केली जातेय (people beat police constable in Delhi khyala area).

VIDEO : पोलीसही माणूस, त्याला इतकी निघृणपणे मारहाण का? दोन महिला, सहा पुरुषांचं अमानुष कृत्य, व्हिडीओ व्हायरल
भर रस्त्यात पोलिसाला निर्दयी मारहाण, दोन महिला आणि सहा पुरुषांचं मिळून कृत्य, व्हिडीओ व्हायरल

दिल्ली : राज्यासह देशभरात कोरोनाचं पुन्हा थैमान सुरु आहे. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी सरकारकडून सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, या काळात डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, आरोग्य अधिकारी आणि पोलीस महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. कोरोना काळात पोलिसांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. पोलीस या संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा करत नाहीयत. मात्र, सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका पोलिसाला जमावाकडून प्रचंड मारहाण केली जातेय (people beat police constable in Delhi khyala area).

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

व्हायरल व्हिडीओत प्रचंड गर्दी जमली आहे. काही दोन-तीन महिला एका पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमलेली दिसत आहे. दोन महिला पोलिसाला मारहाण करतात. यावेळी पोलीस तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्या महिलेचे इतर नातेवाईक जवळपास पाच ते सहा जण त्या पोलीस कर्मचाऱ्याला प्रचंड मारहाण करतात. काही जण तर रॉडने मारहाण करताना दिसत आहेत. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हिडीओ नेमका कुठला?

संबंधित व्हिडीओ हा पश्चिम दिल्लीतील ख्याला या परिसरातील आहे. ज्या पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आली त्याचं नाव राम असं असल्याचं समोर आलं आहे. या पोलिसाचं मारहाण करणाऱ्या महिलांशी कोणत्यातरी विषयावर बाचाबाची झाली होती. त्यावरुन महिलांनी हंगामा केला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसाला जेव्हा मारहाण होत होती तेव्हा दिल्ली पोलिसांना एक PCR कॉल आला. त्याद्वारे संबंधित प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांकडून आठ जणांना अटक

पोलिसांनी याप्रकरणी तपास केला. त्यानंतर त्यांनी आठ जणांना अटक केली. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलिसाला अशाप्रकारे निर्दयी मारहाण करणं योग्य नसल्याचं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे. तर या मारहाणीमागील खरं नेमकं कारण काय असेल? असा सवाल उपस्थित केला जातोय. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत (people beat police constable in Delhi khyala area).

व्हिडीओ बघा : 

हेही वाचा :

VIDEO | शरणागतीच्या तयारीतील 13 वर्षीय तरुणाची गोळी झाडून हत्या, Chicago पोलिसांचा क्रूर चेहरा उघड

Published On - 3:42 pm, Fri, 16 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI