नवऱ्याला वाटलं बायकोचा गर्भपात झालाय, पण डॉक्टर म्हणाले, गळ्यावरुन सुरा फिरवलाय, ही तर हत्या!

| Updated on: Jun 02, 2022 | 12:56 PM

Murder Mystery : जेव्हा या गरोदर महिलेचा पती आणि सासू रुग्णालयात या महिलेला घेऊन गेले, तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय.

नवऱ्याला वाटलं बायकोचा गर्भपात झालाय, पण डॉक्टर म्हणाले, गळ्यावरुन सुरा फिरवलाय, ही तर हत्या!
धक्कादायक घटना
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अयोध्येत एका शिक्षिकेची हत्या (Teacher Murder) करण्यात आली. ही शिक्षिका गरोदर होती. दिवसाढवळ्या या गरोदर शिक्षिकेची (Pregnant Teacher Murder in Ayodhya) तिच्या घरातच हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडालीय. अयोध्येतली श्रीराम पुरम कॉलनीत हे खळबळजनक हत्याकांड घडलं. राहत्या घरात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली, तेव्हा तिच्या पतीला वाटतं की तिचा गर्भपात झाला असावा. पण जेव्हा पती आणि सासू या गरोदर शिक्षिकेला घेऊन रुग्णालयात गेले, तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शिवाय जेव्हा तपासणी केली गेली, तेव्हा या महिलेच्या गळ्यावर जखमा दिसून आल्या. गर्भपातामुळे नाही, तर गळ्यावरुन सुरा फिरवल्यानं या महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसही चक्रावून गेलेत. पोलिसांनी (Murder Mystery investigation) याप्रकरणी अधिक तपास सुरु केला असून आता चौकशी केली जातेय. अयोध्येच्या कोतवाली परिसरात घडलेल्या या खळबळजनक हत्याकांडानं संपूर्ण अयोध्यानगरी हादरलीये.

कधीची घटना?

बुधवारी (1 जून) दुपारी 11 वाजता हत्याकांडाची ही घटना घडली. पोलिसांना या हत्याकांडाबाबत उशिरा माहिती मिळाली. जेव्हा या गरोदर महिलेचा पती आणि सासू रुग्णालयात या महिलेला घेऊन गेले, तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय. हत्येवेळी ही महिला घरात एकटीच होती. तिचा पती आणि सासू कामानिमित्त फैजाबाद इथं गेले होते. जेव्हा ते घरी परतले, तेव्हा या महिलेला बेशुद्ध अवस्थेत पाहून दोघंही धास्तावले.

या कुटुंबीयांच्या घरात बांधकाम सुरु होतं. काही मजूर घरात काम करत होते. त्यामुळे या महिलेची हत्या नेमकी कुणी केली, यावरुन आता संशय बळवलाय.

हे सुद्धा वाचा

कुणी केली हत्या?

लुटमार करण्याच्या उद्देशानं या महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जातोय. सुप्रिया वर्मा असं हत्या करण्यात आलेल्या गरोदर शिक्षिकेचं नाव आहे.

ही महिला बिकापूर ब्लॉकच्या असकरनपूर प्राथमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करत होती. या महिलेचं शव पोलिसांनी पोस्टमॉर्टेमसाठी पाठवलं असून अधिक तपास केला जातोय.

कुटुंबीयांचा हात?

हत्या कुणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र महिलेच्या कुटुंबीयांची आणि घरात काम करणाऱ्या मजुरांची पोलिसांकडून चौकशी केली जातेय. तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस तपास केला जातोय. काही महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून या महिलेच्या नातलगांवरही पोलिसांना संशय असल्याचं सांगितलं जातंय.