Ayush Komkar Murder Case : नाहीतर गोळ्या घालतो.. पोलिसांनी एन्काऊंटरची धमकी दिल्याचा आंदेकर गँगचा धक्कादायक दावा

आयुष कोमकर हत्याप्रकरणातील आरोपींनाकाल कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा आंदेकर कुटुंबाने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले. एन्काऊंटरची धमकी दिल्याचा दावाही करण्यात आला. वाचा सविस्तर..

Ayush Komkar Murder Case : नाहीतर गोळ्या घालतो.. पोलिसांनी एन्काऊंटरची धमकी दिल्याचा आंदेकर गँगचा धक्कादायक दावा
आयुष कोमकर हत्याप्रकरण
Image Credit source: social media
Updated on: Sep 16, 2025 | 8:53 AM

गणेश विसर्जनाच्या, अनंत चतुदर्शीच्या आदल्या दिवशी, 5 सप्टेंबर रोजी पुण्यात भयानक हत्याकांड घडलं. आपसी दुष्मनीतून नाना पेठेत आयुष कोमकर (Ayush Komkar) याची गोळया घालून निर्घृण हत्या करण्यात आली. माजी नगरसेवक मृत वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच त्याच्या वडिलांनी , भावाने हे हत्याकांड घडवल्याचे बोलले जात असून याप्रकरणी बंडू आंदेकर यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात काल पुण्यात सुनावणी पार पडली. मात्र त्यावेळी आंदेकर कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप केले असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

मुलगा,कृष्णा आंदेकर यांला कोर्टात हजर व्हायला सांग, नाहीतर गोळ्या घालतो अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरने केला आहे. तसेच पोलीस आम्हाला कोठडीमध्ये त्रास देत आहेत अशी तक्राही आंदेकर कुटुंबाने न्यायालयात केली आहे. बंडू आंदेकरच्या या आरोपांमुळे पर्चडं खळबळ माजली.

आयुष कोमकर हा 5 सप्टेंबर रोजी क्लासवरून परत येऊन बिल्डींगच्या पार्किंगमध्ये बाईक लावत होता. तेवढ्यातच दोघे तिथे आले आणि त्यानी आयुषवर नेम धरत सटासट गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेला आयुष तिथेच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर तसेच मृत वनराज याचा भाऊ कृष्णा आंदेकर यांनी कट रचत हे हत्याकांड घडवलं. कृष्णा हाच या हत्येचा मास्टरमाईड असल्याची चर्चा आहे.

मात्र आंदेकर कुटुंबातील सर्व आरोपी पोलिसांना सापडले असले तरी मुख्य आरोपी कृष्णा हा अद्याप फरार आहे. पोलिसांना तो अजूनही सापडलेला नाही. यावरूनच पोलिसांनी आपल्याला धमकी दिली आसा आरोप बंडू आंदेकरने केला आहे.
कृष्णाला हजर व्हायला सांग नाहीतर गोळ्या घालतो अशी धमकी तपास अधिकाऱ्यांनी दिली असा दावा बंडू आंदेकने कोर्टात केला आहे. एवढंच नव्हे तर पोलीस आम्हाला कोठडीमध्ये त्रास देत आहेत अशी तक्रार आंदेकर परिवाराने कोर्टात हजर झाल्यावर केली. 4 ते 5 दिवसांपासून पोलिसांनी आम्हाला आंघोळ करू दिली नाही, साधं ब्रशही करू दिलं नाही असं आंदेकर परिवाराने म्हटल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने काल सुरुवातीला अटक केलेल्या 8 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे, कर आरोपी कृष्णा आंदेकर याचा अजूनही शोध सुरूच आहे.