AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूर पुन्हा हादरलं, कॅन्सरच्या उपचारांसाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार, फक्त एका क्लूमुळे…

बिहारमधून उपचारासाठी मुंबईला आलेल्या १३ वर्षीय कर्करोगग्रस्त मुलीवर बदलापूरमध्ये एका २७ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. आरोपीने मुलीला आणि तिच्या कुटुंबाला घर देण्याचा वावगा केला होता. उपचारादरम्यान मुलगी गरोदर असल्याचे समजले आणि गुन्हा उघड झाला.

बदलापूर पुन्हा हादरलं, कॅन्सरच्या उपचारांसाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार, फक्त एका क्लूमुळे...
फोटो सौजन्य - फाईल फोटो
| Updated on: Apr 05, 2025 | 7:56 AM
Share

बिहारमध्ये राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीला कॅन्सरचं निदान झालं. तिला मुंबईत उपचारांसाठी यायचं असल्यानं जवळच्याच गावात राहणाऱ्या एका 27 वर्षीय नराधमानं तिला आधार देत बदलापूरमध्ये भाड्याने घर घेऊन दिलं. पण अखेर त्याच्यातला नराधम जागा झाला. त्याने त्या 13 वर्षांच्या या कॅन्सर पीडित मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवलं. मात्र उपचारादरम्यान मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं आणि या नराधमाचं बिंग फुटलं. या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

बिहारमधल्या या १३ वर्षीय मुलीला कॅन्सर असल्याचं निदान झाल्यानंतर उपचारासाठी मुंबईला येण्याचा सल्ला त्यांना अनेकांनी दिला. हीच संधी साधत जवळच्या गावात राहणाऱ्या सुरज सिंग या नराधमानं तिच्यासह तिच्या कुटुंबियांना बदलापूरमध्ये एक घर भाड्याने घेऊन दिलं. या घरी त्याचंही कुटुंबाला आधार देण्याच्या बहाण्यानं त्याचे नियमित येणं-जाणं होतं. याच दरम्यान संधी साधत त्याने तीन ते चार वेळा कॅन्सर पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर राहिली. उपचारादरम्यान ही बाब उघड झाली.

यानंतर मुंबईच्या कस्तुरबा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत झिरो नंबरचा एफआयआर दाखल केला. यानंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ही तक्रार ट्रान्सफर करण्यात आली. मात्र या गुन्ह्याच्या तपासात आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दोन वेळा खोट्या कहाण्या रचून सांगितल्या. पण हा बनाव सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी ओळखला.

बदलापुरात पुन्हा एकदा संतापाची लाट

त्यानंतर त्यांनी पीडितेच्या कुटुंबाची कसून चौकशी केली. अखेर त्यात त्यांनी सत्य समोर आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी नराधम आरोपी सुरज सिंग याला बिहारमधून बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. यानंतर आरोपी सुरज सिंग याची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर