1 महिन्यात 3 वेळा विकलं, तिच्यासोबत जे घडलं ऐकूनच उडेल थरकाप, अखेर चौथ्यांदा तिने..

बीड जिल्ह्यातून धक्कादायक मानवी तस्करी उघडकीस आली आहे. 21 वर्षीय विवाहित महिलेला पैशांसाठी एकाच महिन्यात तीन वेळा विकले गेले आणि प्रत्येक वेळी जबरदस्तीने लग्न लावले. या भयानक मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी मुख्य आरोपींसह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून आंतरजिल्हा रॅकेटचा तपास सुरू केला आहे.

1 महिन्यात 3 वेळा विकलं, तिच्यासोबत जे घडलं ऐकूनच उडेल थरकाप, अखेर चौथ्यांदा तिने..
क्राईम न्यूज
| Updated on: Mar 10, 2026 | 1:13 PM

पैसा.. जितका मिळेल तितका कमीच वाटतो. याच पैशांच्या मोहात, त्या आमिषाने माणसाचा राक्षस कधी बनतो कळतही नाही. पैशांच्या लालसेने माणुसकीला काळिमा कधी फासला जाईला हेही सांगता येणार नाही. बीड जिल्ह्यात घडलेली घटना म्हणजे याचं जितंजागतं पण अत्यंत भयानक, हृदयद्रावर उदाहरण आहे. तिथे, एका 21 वर्षांच्या विवाहित महिलेला केवळ वस्तू म्हणून वागवलं गेलं आणि एका महिन्यात तब्बल 3 वेगवेगळ्या पुरुषांना विकण्यात आलं. प्रत्येक वेळी तिला जबरदस्तीने लग्नासाठी भागही पाडलं. या सततच्या अपमानामुळे आणि मानसिक छळाला कंटाळून, महिलेने शेवटी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

कुठे घडला भयाक प्रकार ?

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून ही भयानक घटना उघडकीस आली आहे. एका 21 वर्षीय विवाहित महिलेला केवळ पैशासाठी एकाच महिन्यात तीन वेगवेगळ्या पुरूषांना विकण्यात आलं. एवढंच नव्हे तर तिचं त्यांच्याशी जबरदस्तीने लग्नही लावून देण्यात आलं. सतत सुरू असलेले हे हाल, मानसिक त्रास, ही मानवी तस्करी आणि होणार छळ या सगळ्या गोष्टींना कंटाळून पीडितेने विष प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

3 वेळा विकलं, 3 वेळा लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला लातूरची रहिवासी आहे. पीडित महिलेचे लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं, परंतु नवऱ्याच्या गैरवर्तनामुळे ती तिच्या माहेरी, पालकांच्या घरी राहत होती. याच काळात तिची भेट पुण्यातील हडपसर येथील एजंट महानंद याच्याशी झाली. त्यानंतर महानंद याने तिला दुसऱ्या चांगल्या लग्नाचे आमिष दाखवलं आणि तो तिला पुण्याला घेऊन गेला. पण तिथे जाऊन, महानंदने 5 लाख रुपये घेऊन, जबरदस्तीने तिचं लग्न अमर काळभोर नावाच्या पुरूषाशी लावून दिले.

पण तिची दुर्दशा एवढ्यावरच थांबली नाही. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांतच तिला पळवून नेण्यात आलं आणि दुसऱ्या पुरूषाला 4.5 लाख रुपयांना विकण्यात आले. ही क्रूरता एवढ्यावरच थांबली नाही तर 4 मार्च 2026 रोजी, आष्टी तालुक्यातील कांडी बुद्रुक येथील एका पुरूषाशी तिचे तिसरे लग्न जबरदस्तीने करण्यात आले आणि त्याच्याकडूनही 4.5 लाख रुपये खंडणी म्हणून वसूल करण्यात आले.

चौथ्या लग्नाचे वृत्त ऐकताच उचललं टोकाचं पाऊल

मात्र काही दिवसांनी जे घडलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. 6 मार्च रोजी, आरोपीने तिला पुन्हा फोन केला आणि चौथ्या लग्नासाठी तयार रहायला सांगितलं. ते ऐकून ती हादरली, अतिश निराश झाली. वारंवार विकल्या जाणं,लग्न, मानसिक त्रास, अपमानामुळे आणि पुढील छळाच्या भीतीने तिने टोकाचं पाऊल उटलतं विष प्राशन केलं. सध्या तिच्यावर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं.

याप्रकरणाची गंभीर दखल घेत आष्टी पोलिसांनी मुख्य आरोपी महानंद याच्यासह तिचा पती आणि तुळजापूर येथील इतर दोघांविरुद्ध कलम 318 आणि 61 (मानवी तस्करी आणि फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शरद ज्ञानदेव भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे हे आंतरजिल्हा रॅकेटचा तपास करत असून आरोपींना अटक करण्यासाठी कसून शोध मोहिम सुरू आहे.

Follow Us