AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोकुळ गीतेंना आम्ही मदत केली, शिवसेना ठाकरे गटाचा धक्कादायक खुलासा, संजय राऊत यांनी..

संजय राऊत यांनी भाजपासोबतच थेट एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. नाशिकच्या निकालाबद्दल बोलताना संजय राऊत दिसले. त्यांनी नाशिकच्या उमेदवाराला आम्हीही मदत केल्याचा मोठा खुलासा केला.

गोकुळ गीतेंना आम्ही मदत केली, शिवसेना ठाकरे गटाचा धक्कादायक खुलासा, संजय राऊत यांनी..
Sanjay Raut
| Updated on: Jun 22, 2026 | 10:49 AM
Share

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकताच भाजपावर टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, शाह सैना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले. नाशिकची उमेदवारी मागे घेतली तरीही लोकांनी कसे मतदान केले, हा चमत्कारच म्हणावा लागेल. हे सगळे मतदार शिंदे गटाचे आणि भाजपाचे यांना सुरक्षित ठेवले होते, ठाण्यात. आपल्या सर्वांनी माहिती आहे की, एकनाथ शिंदे यांच्या निगराणी खाली. आदल्यादिवशी ते मतदानासाठी गेले आणि शिंदेंच्या विरोधातील उमेदवाराला मतदान केले. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान केले. हा एक रोष आहे. गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडून सहकार्य मागितले. आम्ही त्यांना ते दिले. आमचे जे मतदान होते, ते आम्ही त्यांच्याकडे वळवले. त्याच्याही त्यांना फायदा झाला.

शिंदे गटात आणि भारतीय जनता पक्षात नक्की कोणत्या प्रकारची संबंध आहेत, मुख्यमंत्र्‍यांच्या चेहऱ्यावर जरी तुम्हाला आज हसू दिसत असले शिंदे बाजूला असताना तर ते हसू खोटे आहे. दिल्लीमधून शिंदेंना बळ दिले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी. आमच्यासारखे जे लोक आहेत, ते या घडामोडींकडे सध्यातरी दुरून पाहत आहेत.

पण शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपाने पाडला.. ठीक आहे याला पण बंड म्हणा.. जसे ते म्हणतात. गोकुळ गीतेला धमक्या दिल्या, त्यांच्यावर दबाव आणला. शिंदे गटाने ही जी गद्दारी करून घेतली आहे , त्यावरून लोकांचा रोष दिसून येत आहे. या गद्दारीमागे स्पष्ट आहे की, आम्ही मुंबईसह राज्य पैशांनी विकत घेऊ शकतो. अस्मितेसाठी लढणारे शिवसेनेसारखे जे पक्ष आहेत, ते आम्ही पैशाच्या ताकदीवर फोडू शकतो.

ही जी मस्ती आहे ना…ती त्यांच्या पार्श्वभागात घातली जाईल. खासदार आमदार फोडू शकता पण आमची जिद्द नाही. पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, शिंद्यांसारखे जे शैतान निर्माण झालेत किंवा अमित शहा यांनी निर्माण केलेले. जे शैतान देवेंद्र फडणवीस यांच्याही मानेवर बसतील. या संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेतील.

Follow Us
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती