भाजपच्या माजी नगरसेविकेची 17 वेळा चाकूने भोसकून हत्या, नणंद आणि भाच्याला अटक

| Updated on: Jun 29, 2021 | 3:44 PM

रेखा कदिरेश यांची गेल्या गुरुवारी राहत्या घरासमोर हत्या झाली होती. सकाळी साडेदहा वाजत्या सुमारास त्या गरजूंना अन्नवाटप करुन घरी येत होत्या. त्यावेळी त्यांना 17 वेळा चाकूने भोसकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

भाजपच्या माजी नगरसेविकेची 17 वेळा चाकूने भोसकून हत्या, नणंद आणि भाच्याला अटक
माजी नगरसेविका रेखा कदिरेश आणि पती एस कदिरेश
Follow us on

बंगळुरु : भाजपच्या माजी नगरसेविकेची हत्या केल्या प्रकरणी नणंद आणि नणदेच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. कर्नाटकातील भाजपच्या माजी नगरसेविका रेखा कदिरेश (Rekha Kadiresh) यांची गेल्या आठवड्यात बंगळुरुत हत्या करण्यात आली होती. राहत्या घरासमोर चाकूने भोसकून रेखा यांना जीवे ठार मारण्यात आलं होतं. (Bengaluru Former BJP corporator Rekha Kadiresh Murder sister-in-law her son arrested)

रेखा कदिरेश हत्याकांडात पोलिसांनी पाच संशयितांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. पीटर, सुर्या, स्टीफन, अजय आणि पुरुषोत्तम यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर रेखाच्या मयत पतीची बहीण माला राजकन्नन आणि तिचा मुलगा अरुण यांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. माला आणि अरुण पाच आरोपींच्या संपर्कात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कोण होत्या रेखा कदिरेश?

रेखा कदिरेश या दोन वेळा भाजपकडून नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या. बंगळुरुतील चलवादिपल्य वॉर्डमध्ये त्या राहत होत्या. त्यांचा नवरा एस कदिरेश हा कुख्यात गुन्हेगार होता. फेब्रुवारी 2018 मध्ये त्याची हत्या झाली होती.

17 वेळा चाकूने भोसकून हत्या

रेखा कदिरेश यांची गेल्या गुरुवारी राहत्या घरासमोर हत्या झाली होती. सकाळी साडेदहा वाजत्या सुमारास त्या गरजूंना अन्नवाटप करुन घरी येत होत्या. त्यावेळी त्यांना 17 वेळा चाकूने भोसकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांना तातडीने केम्पे गौडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आले, परंतु रेखा यांचा जीव वाचू शकला नाही. रेखा यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर कॉटनपेट पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रेखा कदिरेश यांच्यावर हल्ला झाला, त्यावेळी परिसराती सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते. त्यामुळे हा नियोजनबद्ध कट असल्याचा संशय बंगळुरु पोलिसांनी व्यक्त केला होता. शुक्रवारी पोलिसांनी सुर्या आणि पीटर यांची धरपकड केली. पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलवर हल्ला करुन दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला होता.

संबंधित बातम्या :

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडून पोटच्या मुलीची पाण्याच्या हौदात बुडवून हत्या

पुण्यात टोळीयुद्ध वाढली, सहा महिन्यात हत्येच्या प्रयत्नाचे 139 गुन्हे, 38 हत्याकांड

(Bengaluru Former BJP corporator Rekha Kadiresh Murder sister-in-law her son arrested)