Bhaiyyu Maharaj | भय्यू महाराजांच्या मातोश्रींचे निधन, अंत्यसंस्कारावरुन दुसरी पत्नी आणि मुलीत वाद

Bhaiyyu Maharaj | भय्यू महाराजांच्या मातोश्रींचे निधन, अंत्यसंस्कारावरुन दुसरी पत्नी आणि मुलीत वाद
Bhaiyyu Maharaj, Daughter Kuhu (Left) and Wife Ayushi

भय्यूजी महाराजांची दुसरी पत्नी आयुषी यांनी कुहूला आडकाठी केल्याने अंत्यसंस्कारावरुन दोघींमध्ये वाद झाला (Bhaiyyu Maharaj Mother Kumudini Devi dies )

अनिश बेंद्रे

|

May 12, 2021 | 2:41 PM

मुंबई : दिवंगत आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या मातोश्री कुमुदिनी देवी (Kumudini Devi) यांचे निधन झाले. इंदौरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कुमुदिनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा भय्यू महाराजांची कन्या कुहूने व्यक्त केली. मात्र महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आयुषी यांनी आडकाठी केल्याने अंत्यसंस्कारावरुन दोघींमध्ये वाद झाला. (Bhaiyyu Maharaj Mother Kumudini Devi dies in Indore Daughter Kuhu Second Wife Ayushi fights over Last rites)

इंदौरमध्ये उपचारादरम्यान निधन

कुमुदिनी देवी या भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात महत्त्वाच्या साक्षीदार होत्या. आजारपणामुळे त्यांच्यावर मध्य प्रदेशातील इंदौरमधील इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु होते. परंतु शनिवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजीच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुहू पुण्याहून इंदौरला गेली.

आजीवर अंत्यसंस्काराची कुहूची इच्छा

मुक्तिधाममध्ये जात कुहूने आजीवर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. आजोबा आणि पिता भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले होते, त्यामुळे हिंदू रिवाजानुसार आजी कुमुदिनी यांच्यावरही मलाच अंत्यसंस्कार करु द्या, अशी विनंती कुहूने केली. भय्यू महाराजांची दुसरी पत्नी अर्थात कुहूची सावत्र आई आयुषी यांनी आक्षेप घेतला. आयुषी यांच्या नातेवाईकांनीही त्यांची बाजू उचलून धरली. त्यामुळे अंत्यसंस्कार कोण करणार या मुद्द्यावर दोघींमध्ये कित्येक तास वाद सुरु होता.

तीन वर्षांपूर्वी भय्यू महाराजांची आत्महत्या

भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी इंदूरमध्ये राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी आई कुमुदिनी जबाब नोंदवणार होत्या. मात्र हा खटला दीर्घ काळापासून प्रलंबित राहिला. फिर्यादींनी आयुषीसह मिळून कुमुदिनी देवींची साक्ष न घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठीही अर्ज केला जाऊ शकतो, असं वकील धर्मेंद्र गुर्जर म्हणाले.

भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करुन लग्नासाठी दबाव आणणाऱ्या युवतीला दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. तर महाराजांचे सेवक विनायक आणि शरद हे दोघेही त्या तरुणीला या कामात मदत करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भय्यू महाराजांची दुसरी पत्नी आयुषी आणि त्यांच्या अन्य नातेवाईकांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला होता.

संबंधित बातम्या

भय्यू महाराजांच्या विश्वासू सेवकाला बेड्या, विनायक कसा सापडला?  

भय्यूजी महाराजांना अश्लील सीडीने ब्लॅकमेल करणारी ‘ती’ कोण?  

(Bhaiyyu Maharaj Mother Kumudini Devi dies in Indore Daughter Kuhu Second Wife Ayushi fights over Last rites)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें