भिवंडीत तबेल्यातील जनावरांवर प्राणघातक हल्ला, 7 म्हशी-रेडे मृत्युमुखी, अनेक गंभीर

भिवंडीत तबेल्यातील जनावरांवर प्राणघातक हल्ला, 7 म्हशी-रेडे मृत्युमुखी, अनेक गंभीर
भिवंडी म्हशी-रेड्यांवर हल्ला
Image Credit source: टीव्ही 9

हल्ल्यात 7 म्हशी-रेडे अशी जनावरे मृत्युमुखी पडली, तर 10 ते 12 जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. हा हल्ला नेमका कोणी केला, याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. त्याचप्रमाणे या घृणास्पद प्रकारामागील नेमके कारणही अजून अस्पष्टच आहे

संजय भोईर

| Edited By: अनिश बेंद्रे

May 15, 2022 | 12:13 PM

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात (Bhiwandi Crime News) अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. बंदर मोहल्ला या ठिकाणी असलेल्या तबेल्यातील म्हशी रेडे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला (Attack in Stable) केला. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. या हल्ल्यात 7 म्हशी-रेडे (Buffalos) अशी जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तर 10 ते 12 जनावरे गंभीर जखमी झाली असल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं

भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला येथील तबेल्यात अज्ञात इसमांनी हा हल्ला चढवला. तब्बल 22 म्हशींचे गळे, पायाच्या नसा सुऱ्याने कापण्यात आल्या. या घटनेत 7 म्हशींना प्राण गमवावे लागल्याची दुःखद बातमी आहे. तर 15 म्हशी गंभीर जखमी झाल्या असून त्यामधील काही म्हशी अत्यवस्थ आहेत.

हे सुद्धा वाचा

भीषण हल्ल्याचे कारण अस्पष्ट

हा हल्ला नेमका कोणी केला, याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. त्याचप्रमाणे या घृणास्पद प्रकारामागील नेमके कारणही अजून अस्पष्टच आहे. याबाबत निजामपुरा पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें