
विवाहित महिलेच एका युवकाशी अफेअर होतं. दोघे लपून-छपून भेटायचे. पण प्रेम आणि सुगंध कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नाही. इथे सुद्धा असच काहीतरी झालं. एकदिवस प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी पोहोचला. त्यावेळी तिच्या सासू-सासऱ्यांनी दोघांना रोमान्स करताना पकडलं. त्यानंतर इतका आरडाओरडा झाला की, गोष्ट सगळ्या गावात पसरली. दोघांचं लग्न लावून दिलं. हैराण करणारी बाब म्हणजे महिलेचा पती म्हणाला की, माझी पत्नी जर त्याच्या प्रेमात असेल, तर तिचं लग्न त्याच्याशीच लावून देतो. बिहारच्या भागलपुरमधील हे प्रकरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंगेर जिल्ह्यातील तारापूरच्या राहणाऱ्या साक्षीच (20) (बदलेलं नाव) लग्न वर्षभरापूर्वी अंगारी गावच्या बिट्टू उर्फ सिंकदर कुमार सिंह सोबत झालं. लग्नानंतर काही दिवसातच बिट्टू रोजगाराच्या शोधत बंगळुरुला गेला.
घराच्या छतावर एका छोट्याशा खोलीत रहायचा
या दरम्यान साक्षी पूर्व प्रियकर राहुल सिंहच्या पुन्हा संपर्कात आली. दोघे जवळ आले. बिट्टूने गावातच कुटुंबापासून स्वतंत्र राहण्यासाठी एक वेगळी खोली बनवलेली. तिथे साक्षी एकटी रहायची. पती घराबाहेर असल्याचा तिने फायदा उचलला. साक्षीने पाच दिवस आधी पूर्व प्रियकर राहुलला घरी बोलावलं. कुटुंबियांनी संशय येऊ नये म्हणून तिने तब्येक ठीक नाहीय, जेवण बनवू शकत नाही अशी कारणं दिली. राहुल घराच्या छतावर एका छोट्याशा खोलीत रहायचा.
पंचायत बोलवण्यात आली
काल रात्री साक्षीचे सासू-सारे तिच्यासाठी जेवण घेऊन आले. त्यावेळी त्यांनी दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर एकच गोंधळ सुरु झाला. ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. पंचायत बोलवण्यात आली. पंचायतीचा निर्णय झाला. त्यानुसार दोघांच गावातच लग्न लावण्यात आलं. ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोघांकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आलं की ते आता पती-पत्नी म्हणून एकत्र राहतील. त्यानंतर राहुलचे कुटुंबिय तिथे पोहोचले. हिंदू रिती-रिवाजानुसार मुलीला निरोप दिल्यानंतर तिला घरी घेऊन आले.
साक्षीच्या कुटुंबियांनी काय सांगितलं?
दुसरीकडे साक्षीच्या कुटुंबियांना या बद्दल समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येण्यास नकार दिला. त्याचं म्हणणं होतं की, ‘तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आम्ही आमचा अपमान करुन घ्यायला तिथे येणार नाही’ ग्रामस्थांमध्ये हे प्रकरण चर्चेचा विषय बनलं आहे.