
बिहार : दोन मुलांचा बाप तीन मुलांच्या आईच्या प्रेमात पडला, तो तेवढ्यावर न थांबता त्याने लग्न देखील केल्याचा प्रकार घडला आहे. ज्यावेळी तो दुसरं लग्न करुन त्याच्या मुळगावी गेला, त्यावेळी त्याच्या पहिल्या बायकोला धक्का बसला आहे. पहिली पत्नी सुध्दा आठ महिन्याची गरोदर असल्याची माहिती पोलिसांनी (Crime news in marathi) दिली आहे. हा सगळा प्रकार सुरुवातीला गावातल्या पंचायतीच्या समोर बसला होता . परंतु पहिल्या पत्नीला त्यांचा निर्णय मान्य नसल्यामुळे पत्नीनं थेट पोलिस स्टेशन (bihar police) गाठलं आहे. हे प्रकरण बिहार (latest bihar news) राज्यातील आहे. पोलिसांना सुध्दा हा प्रकार एकदम धक्कादायक वाटला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सासू आणि नवरा आणि नव्या नवरीला ताब्यात घेतलं असल्याची माहिती एका हिंदी वेबसाईटने दिली आहे. तिघांची कसून चौकशी सुरु असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. कारण त्यांनी पहिल्या पत्नीला गरोदर असताना मारहाण केली आहे.
बिहार राज्यातील अमाही गावातील प्रदीप सदा असं त्या व्यक्तीचं नावं आहे. त्याने मागच्या दहा वर्षापूर्वी लग्न केलं आहे. त्याचबरोबर पहिल्या पत्नीपासून त्याला मुलं सुध्दा आहेत. त्याने ज्या महिलेशी लग्न केलं आहे. त्या महिलेला सुध्दा तीन मुलं आहेत. प्रदीप सदा हा नोकरी निमित्त दिल्लीत गेला होता. तिथं गेल्यानंतर तो एका महिलेच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्याने लग्न करुन त्या महिलेला घरी आणलं आहे.
ज्यावेळी ही गोष्ट पहिल्या पत्नीला समजली, त्यावेळी तिने या प्रकाराला विरोध करायला सुरुवात केली. ज्यावेळी तो दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आला त्यावेळी या प्रकरणाला घेऊन अनेकदा पंचायत झाली आहे. परंतु या प्रकरणावरती कसल्याची प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे पहिल्या पत्नीने नवरा, दुसरी पत्नी आणि सासू यांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पहिली पत्नी आठ महिन्यांची गरोदर आहे. त्याचं लग्न साधारण १२ वर्षापुर्वी झालं आहे. त्यांना दोन मुली देखील आहेत. पहिल्या पत्नीला सासू, नवऱ्याने मारहाण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.