‘ज्या भाच्याला मी लहानाच मोठं केलं, त्यानेच माझ्या बायकोला…’, मामाचं दु:ख, पण मामीचं ओपन चॅलेंज

एक महिला आपल्या नवऱ्याला सोडून भाच्यासोबत पळून गेली. ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आता आपल्या पहिल्या नवऱ्याला चॅलेंज केलय. काय आहे हे चॅलेंज जाणून घ्या....

ज्या भाच्याला मी लहानाच मोठं केलं, त्यानेच माझ्या बायकोला..., मामाचं दु:ख, पण मामीचं ओपन चॅलेंज
extramarital affair
| Updated on: Aug 01, 2025 | 12:54 PM

एका महिलेने पतीला सोडून भाच्यासोबत लग्न केलं. बिहारच्या जुमईमधून ती हैदराबादला पळून गेली. नवरा सुद्धा तिला काही बोलला नाही. तिला जाऊ दिलं. पण पत्नीच्या मनाला नवऱ्याची एक गोष्ट इतकी लागली की, तिने थेट आव्हानच देऊन टाकलं. तिच म्हणणं आहे की, पती तिच्याविषयी विविध अफवा पसरवत आहे. पती सांगतोय की, माझं भाच्यासोबत ब्रेकअप झालय. आता तर मी जुमईला येऊन नवऱ्याच्या घरासमोर भाच्यासोबत राहणार. बघू हा काय करतो?.

“बघू, आम्हाला कोण रोखतं?. मी मरीन पण पहिला पती विशाल जवळ जाणार नाही. आपल्या पहिल्या पतीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. माझा पती माझ्याबद्दल अफवा पसरवत आहे. मी काय सगळं सोडून त्याच्याजवळ परत जाणार. विशालच्या आयुष्यातून देवाने मला बाहेर काढलय. मी त्याच्या आयुष्यात पुन्हा का जाईन?” असं आयुषी म्हणाली. तिने भाचा सचिन सोबत लग्न केलय.

विशाल इतक्या खालच्या पातळीला गेलाय की…

“मी विशालच्या छळाला कंटाळून दुसरं लग्न केलं. आता पहिल्या पतीकडे जाणार नाही. मी किती लोकांना स्पष्टीकरण देऊ. मला काही कळत नाहीय. विशाल इतक्या खालच्या पातळीला गेलाय की, देवही त्याला माफ करणार नाही. मी काही दिवसात आपल्या गावी परत येईन. लोकांना जे वाटतय मी विशालसोबत राहीन, मी त्यांना दाखवून देईन, पती सचिन सोबतच राहणार. मी या सगळया गोष्टींमुळे हैराण झाली आहे. सगळ्यांना दाखवून देईन मी कोणाकडे जाणार ते” असं आयुषी म्हणाली.

सचिन दुबेबरोबर जवळीक वाढली

आयुषीच पहिलं लग्न 2021 साली विशाल दुबे बरोबर झालेलं. कुटुंब राजीव नगरमध्ये रहायचं. दोघांना एक चार वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर दोन वर्षांची आयुषीची नात्यात भाचा लागणाऱ्या सचिन दुबेबरोबर जवळीक वाढली. तो शेजारीच रहायचा. 15 जून रोजी आयुषी पती आणि मुलीला सोडून सचिन सोबत घरातून पळून गेली. त्यानंतर विशाल दुबेने टाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस चौकशी दरम्यान दोन्ही प्रेमी समोर आले. त्यानंतर गावच्या शिव मंदिरात शुक्रवारी 20 जून रोजी गावकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं.

दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते

पहिल्य पतीला सुद्धा यावर काही आक्षेप नव्हता. विशाल लोकांना सांगू लागला की, ‘ज्याला मी माझ्या हातानी मोठं केलं, तोच भाचा माझ्या पत्नीला घेऊन पळाला’ “दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. समजल्यावर त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने सर्व काही धुडकावलं आणि भाच्यासोबत निघून गेली. जर मी तिला जाऊ दिलं नसतं, तर तिने जीवे मारलं असतं. माझी मुलगी समजूतदार आहे. आधी तिला आईची आठवण यायची. मी आणि माझी आई तिचा संभाळ करतोय. आता ती माझं आयुष्य आहे. मी दुसरं लग्न करणार नाही. लग्नाचा मला तिटकारा आहे” असं आयुषीचा पहिला नवरा विशाल दुबे म्हणाला.