
एक अजब प्रकरण समोर आलय. प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. पण प्रेमात पडल्यानंतर काही मर्यादा पाळाव्या लागतात. काही गोष्टींचा विचार करावा लागतो. बिहारच्या मुंगेरमध्ये असच एक प्रेम प्रकरण समोर आलय. वृद्धत्वाकडे झुकलेल्या एका व्यक्तीने लव्ह मॅरेज केलं. त्याचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तिच्यापासून त्याला तीन मुलं आहे. तिन्ही मुलं तरुण आहेत. ज्या महिलेसोबत या व्यक्तीने दुसरा विवाह केला, ती आधीपासून विवाहित होती. लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीने विष प्राशन केलं. हे विष तो स्वत: प्याला की, कोणी त्याला दिलं हा अजूनही सस्पेन्स आहे.
धरहरा पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. पचरूखी सुमेरीचक गावच्या 55 वर्षीय मुसहरू यादवने 40 वर्षाच्या शेजारणीसोबत प्रेम विवाह केला. दोघांनी आपल्या तरुण मुलांचा विचार न करता हे पाऊल उचलला. मुसहरूला त्याची दुसरी पत्नी सोडून गेली, म्हणून त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण हेच कारण आहे, असं अजून ठामपणे म्हणता येत नाहीय.
शेजारी राहणाऱ्या मुसहरूसोबत प्रेमसंबंध सुरु झाले
मुसहरूला तीन मुलं आहेत. महिलेला एक मुलगी आणि मुलगा आहे. महिलेच्या पहिल्या पतीच नाव फंटुश मंडल आहे. विवाहित असतानाही महिलेचे शेजारी राहणाऱ्या मुसहरूसोबत प्रेमसंबंध सुरु झाले. महिलेच्या पतीला या बद्दल समजलं, त्यावेळी दोघांमध्ये वादविवाद, भांडणं सुरु झाली. नवरा मारहाण करत असल्याने पत्नी तिच्या माहेरी निघून गेली. एक महिन्यापूर्वी दोघा पती-पत्नीमधला वाद मिटला.
लग्नाचे फोटो सुद्धा काढले
पाच दिवसांपूर्वी शुक्रवारी तिने बौरना डोंगरावरील शिवालय येथे मुसहरू सोबत लग्न केलं. लग्नाचे फोटो सुद्धा काढले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले. विवाहाच्याच दिवशी काही कारणांमुळे नाराज होऊन नवीन पत्नी निघून गेली.
नवविवाहिता पत्नी फरार
शनिवारी संध्याकाळी मुसहरू यादवने कीटकनाशक प्राशन केलं. त्याला आधी सामुदायिक स्वास्थ्य केंद्र धरहरा येथे नेण्यात आलं. गंभीर स्थिती असल्याने त्याला मुंगेरला रेफर करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नवविवाहिता पत्नी अजूनही फरार आहे.
मुलाने काय सांगितलं?
मी लग्न केलेलं नाही. मला मुलाने घराबाहेर काढलं असं मुसहरू यादव मंगळवारी म्हणाला. घरातल्या भांडणामुळे की दुसऱ्या कुठल्या कारणामुळे त्यांनी विष प्राशन केलं माहित नाही, असं मुलाने सांगितलं. त्यांनी कधी लग्न केलं हे कळलच नाही. त्यांनी दुसरं लग्न केलय, हे मला बाहेरुन समजलं. जेव्हा आम्ही त्यांना या महिलेबद्दल विचारलं, तेव्हा ते गप्प राहतात, कदाचित ते आमच्यापासून काही लपवत असावेत.