आधी बेशुद्ध केलं, मग…सबा परवीन नवऱ्यासोबत असं का वागली?

सबा परवीनच मोहम्मद मुमताज सोबत लग्न झालेलं. त्यांचा चांगला सुखी संसार होता. त्यांना मूलंबाळं होती. पण सबा परवीनला एक गोष्ट सहन झाली नाही.

आधी बेशुद्ध केलं, मग...सबा परवीन नवऱ्यासोबत असं का वागली?
Crime News
| Updated on: Jul 15, 2025 | 1:24 PM

बिहारच्या मुजफ्फपूर जिल्ह्यात सात जुलै रोजी एका व्यक्तीची हत्या झाली. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. मोहम्मद मुमताज असं त्यांचं नाव आहे. मोहम्मद मुमताज मुजफ्फपुर जिल्ह्यात रोजगार सेवक होता. पोलीस या हत्याकांड प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आता एक खुलासा केलाय. मोहम्मद मुमताजची हत्या त्याच्या पत्नीनेच केली.

आरोपी पत्नीच नाव सबा परवीन आहे. काजी मोहम्मदपूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या हत्याकांड प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांनी मृतकाच्या मुलांची चौकशी केली. मुलांच्या चौकशीतून पोलिसांचा पत्नीवरील संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद मुमताजच्या पत्नीची चौकशी केली.

का केली हत्या?

पोलीस चौकशीत मृतकाच्या पत्नीने मान्य केलं की, तिनेच नवऱ्याची हत्या केलीय. आरोपी पत्नीने सांगितलं की, पतीला बेशुद्ध करण्यासाठी आधी तिने हातोडीने प्रहार केला. त्यानंतर धारदार शस्त्राने पतीचा जीव घेतला. आरोपी पत्नीने सांगितलं की, पतीच दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरु होतं. त्यामुळे ती नाराज होती. त्यातून तिने हा क्रूर अपराध केला.

पोलिसांनी काय जप्त केलं?

पोलिसांनी त्यांच्या घरातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीवीआर, मोबाइल आणि अन्य साहित्य जप्त केलय. पोलीस सूत्रानुसार, आरोपी पत्नीने आधी हातोड्याचे घाव घालून नवऱ्याला बेशुद्ध केलं. मग धारदार शस्त्र चालवून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर डीवीआर, मोबाईलसह अन्य सामान घराच्या मागे जंगलात फेकून दिलं.