AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SA: न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 68 धावांनी नमवलं, मालिकेतील दुसऱ्या सामन्यात असं घडलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपल्यानंतर न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे उर्वरित 3 सामन्यात कस लागणार आहे.

NZ vs SA: न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 68 धावांनी नमवलं, मालिकेतील दुसऱ्या सामन्यात असं घडलं
NZ vs SA: न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 68 धावांनी नमवलं, मालिकेतील दुसऱ्या सामन्यात असं घडलंImage Credit source: New Zealand cricket Twitter
| Updated on: Mar 17, 2026 | 4:01 PM
Share

South Africa tour of New Zealand 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही संघात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. आतापर्यंत दोन सामने झाले असून 1-1 अशी बरोबरी झाली आहे. मालिकेतील पहिला सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कमबॅकचं आव्हान न्यूझीलंडपुढे होते. अखेर त्यात यश आलं आणि न्यूझीलंडने दुसरा टी20 सामना 68 धावांनी जिंकला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 175 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने 107 धावांवरच नांगी टाकून दिली. न्यूझीलंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करता अवघ्या 18 धावांच्या अंतरात दक्षिण अफ्रिकेने पाच विकेट गमावले. इतकंच काय तर टॉपचे 6 फलंदाज 20 धावांचा आकडाही गाठू शकले नाहीत. या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं.

नाणेफेकीच कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकला. डेवॉन कॉनवेने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. एका बाजूने धडाधड विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने मोर्चा सांभाळला. डेवॉन कॉनवेने 49 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. तर निक केलीने 21, मिचेल सँटनरने 20, जोश क्लार्कसनने नाबाद 26 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडला 175 धावांपर्यंत मजल मारता आली. तसेच विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिका सहज गाठेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 107 धावांवर रोखलं.

दक्षिण अफ्रिकेकडून वियान मल्डर आणि कॉनर एस्टरहुइझेन ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. न्यूझीलंडच्या बेन सीयर्सने 14 धावा देऊन 3 विकेट काढल्या. मिचेल सँटनरने 2 आणि लॉकी फर्ग्युसनने 3 विकेट घेतल्या. मॅकॉन्की आणि नीशमला प्रत्येकी एक विकेट मिळाली. दक्षिण अफ्रिकेचा मधल्या फळीचे फलंदाज बाद झाल्यानंतर शेवटचे पाच विकेट 18 धावातच पडले. 13 व्या षटकात 89 धावांवर दक्षिण अफ्रिकेची सहावी विकेट पडली. त्यानंतर 15.3 षटकात 107 धावांवर दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ तंबूत होता.

Follow Us
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर