AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी टीम आऊट! दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघाचं गणित पाकिस्तानमुळे बिघडलं

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. या स्पर्धेत एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत. असं असताना या स्पर्धेपूर्वीत दोन वेळा जेतेपद मिळवलेल्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संकटात आलं आहे. पाकिस्तानच्या पराभवामुळे नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी टीम आऊट! दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघाचं गणित पाकिस्तानमुळे बिघडलं
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी टीम आऊट! दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघाचं गणित पाकिस्तानमुळे बिघडलंImage Credit source: Bangladesh Cricket Twitter
| Updated on: Mar 17, 2026 | 3:37 PM
Share

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा पुढच्या वर्षी होणार आहे. या स्पर्धेची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. दर वर्षांनी येणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद मिळवण्याचं स्वप्न प्रत्येक संघ उराशी बाळगून असतो. पण या स्पर्धेत पात्र ठरणं ही देखील मोठी बाब आहे. या स्पर्धेच्या जेतेपदासाठी एकूण 14 संघ मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे 14 संघात जागा मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. असाच फटका आता दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघाला बसण्याची शक्यता आहे. बांगलादेशने पाकिस्तानला वनडे मालिकेत 2-1 ने पराभूत केलं. या ऐतिहासिक मालिका विजयासह बांगलादेशने 2027 वनडे वर्ल्डकप पात्रता फेरीत मोठा उलटफेर केला आहे. ढाकाच्या शेर ए बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये तिसर्‍या आणि शेवटच्या वनडे सामन्यात बांगलादेशने 290 धावांचं आव्हान दिलं होतं. हा सामना बांगलादेशने 11 धावांनी जिंकला. त्यामुळे बांगलादेशच्या आयसीसी क्रमवारीत सुधारणा होणार आहे. त्याचा फटका दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या वेस्ट इंडिजला बसण्याची शक्यता आहे.

बांगलादेशचा संघ सध्या आयसीसी क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. आता नव्या क्रमवारीत बांगलादेशचा संघ दहाव्यावरून नवव्या स्थानी झेप घेईल. तर वेस्ट इंडिजचा संघ दहाव्या स्थानावर जाईल. त्यामुळे वेस्ट इंडिजचं टेन्शन वाढणार आहे. ही स्पर्धा दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे येथे होणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना थेट तिकीट मिळालं आहे. तर उर्वरित 8 संघ आयसीसी वनडे क्रमवारीवरून ठरणार आहेत. म्हणजेच नवव्या स्थानापर्यंत संघ थेट पात्र ठरतील. कारण टॉप 8 मध्ये दक्षिण अफ्रिकेचा संघ असल्याने नवव्या स्थानावरील संघाला थेट तिकीट मिळेल. त्यानंतर दहाव्या क्रमांकापासून पुढच्या संघांना पात्रता फेरीत खेळावं लागेल.

वेस्ट इंडिजचं सर्वात मोठं दु:ख म्हणजे एकही सामना न खेळता क्रमवारी ढासळली आहे. आता पुढची वनडे मालिका सप्टेबंर ऑक्टोबर महिन्यात भारताविरुद्ध होण्याची शक्यता आहे. जर या मालिकेत चांगले गुण मिळवता आले नाही तर पात्रता फेरीत खेळण्याची वेळ येईल. मागच्या पर्वातही वेस्ट इंडिजचा संघ पात्र ठरू शकला नव्हता. त्यामुळे पात्रता फेरीत खेळावं लागलं. पण येथेही पदरी निराशा पडली. दुसरीकडे, बांगलादेशने या विजयासह 2027 वर्ल्डकप स्पर्धेत थेट एन्ट्री घेण्याचा दावा मजबूत केला आहे. आता थेट डिसेंबर महिन्यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल