AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंचा एक मोठा इशारा, काही मिनिटांत सूत्र हलली; पत्रकारो परिषदेतच थेट मंत्री सामंतांचा फोन

Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला एक मोठा इशारा दिला. त्यानंतर काही मिनिटांत सूत्र हलली. त्यानंतर पत्रकार परिषदेतच थेट मंत्री सामंतांचा जरांगेंना फोन आला.

मनोज जरांगेंचा एक मोठा इशारा, काही मिनिटांत सूत्र हलली; पत्रकारो परिषदेतच थेट मंत्री सामंतांचा फोन
| Updated on: Aug 06, 2026 | 2:26 PM
Share

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण मिळण्यास दिरंगाई होऊ लागल्याने सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत अनेक मराठा लोकप्रतिनिधी कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने पदावरुन पायउतार झाले आहेत. तर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी जुनी नोंद उपलब्ध होईना झाली आहे, असा आरोप जरांगेंनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर मनोज जरांगेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारी मंत्र्‍यांवर जोरदार हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेतच मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांना फोन लावला. या दोघांमंध्ये नेमकं काय संभाषण झालं, जाणून घेऊयात.

मनोज जरांगे यांना भर पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत यांचा फोन आला. मनोज जरांगे म्हणाले, आम्ही शिंदे साहेबांसाठी खस्ता खातो. त्यानंतर माझ्याच विरोधात आंदोलन करण्यासाठी शिंदेंच्या एका आमदाराच्या कॉलेजवर बैठका होत आहे. मी या नेत्याचं नाव सांगणार नाही. तुम्ही शोधून घ्या. माझ्याविरोधात मोर्चा काढण्यासाठी बैठका सुरू आहे. प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी बैठका आहे. मराठा आंदोलनावर टीका करणारे तुमच्यासोबत बाळासाहेब भवनमध्ये काय करत आहे?’

उदय सामंत उत्तर देताना म्हटले की, ‘मी बघतो, आधी दाखले कसे रद्द होतात, म्हणून मी विधानही केलं आहे. मी आता फडणवीस दादांशी बोलून घेतो. विखे पाटलांशी देखील बोलून घेतो’. त्यानंतर सामंत म्हणाले, ‘मराठा समाजातील लोकप्रतिनिधींचं प्रमाणपत्र रद्द झालं, त्यामुळे महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला. खरंतर त्यांचं काही नाही. दोन दिवसांआधी जातपडताळणी काढण्यासाठी आदेश रद्द काढतात. त्यानतंर दुसऱ्या दिवशी जातप्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिले जातात. हे सगळं छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं. या प्रकरणामुळे मराठ्यांच्या नोंदी बोगस असल्याचा संदेश देतो’.

जरांगे पुढे म्हणाले, ‘मला शिंदे साहेबांकडून अपेक्षा नव्हती. मी भरपूर खस्त्या खाल्ल्या आहेत. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसी नेते बाळासाहेब भवनात काय करतात, त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मी त्यांचे नाव घेत नाही. मी शिंदेंवर नाराज आहे. कारण नुकताच प्रवेश केलेल्या नेत्याच्या कॉलेजवर माझ्या विरोधात बैठका सुरू आहे. मी शिंदेंसाठी जिवाचं रान करत आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने अशा बैठकी होऊ शकत नाही. ते कधीच असे आदेश देत नाही’. त्यानंतर जरांगे पाटील म्हणाले, ‘माझ्या मुलांचं वाटोळं करू नका. मी तुम्ही आणि शंभुराजे देसाई यांच्यामुळे एकनाथ शिंदेंना मानतो. मला 4 नेत्यांचे प्रमाणपत्र वैध करून द्यावे’. त्यानंतर सामंत म्हणाले, मला माहिती द्यावी. व्हाट्सअॅपवर माहिती द्यावी. मला 4 सर्टिफिकेट पाठवा. मी बावनकुळेंशी चर्चा करतो. मी संध्याकाळपर्यंत फोन करतो’.

Follow Us
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका