AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Liquor Shopping : ना रांगेची झंझट ना कॅशची; आता थेट ऑनलाइन खरेदी करता येणार दारू

तमिळनाडूमध्ये दारू खरेदी आता ऑनलाइन होणार आहे. TASMAC गुरुवारी खास मोबाईल ॲप लॉन्च करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना रांगा टाळता येतील आणि MRP पेक्षा जास्त पैसे देण्याची झंझट संपेल.

Liquor Shopping : ना रांगेची झंझट ना कॅशची; आता थेट ऑनलाइन खरेदी करता येणार दारू
आता ऑनलाइ करता येणार लिकर शॉपिंग
| Updated on: Aug 06, 2026 | 2:12 PM
Share

देशात बरेचसे लोक मद्य पितात, अनेकदा त्या दुकानाता जाऊन रांग लावूनही विकत घेतात, मात्र आता दारूसाठी रांगेची झंझट संपणार आहे. कारण एका राज्यात आता मद्य खरेदी ऑनलाइन करता येणार आहे. तमिळनाडूमध्ये दारू विक्रीची पद्धत आता पूर्णपणे बदलणार आहे. ग्राहकांना एमआरपीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू नयेत आणि दारू खरेदी अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (TASMAC) गुरुवारी एक खास मोबाईल ॲप लाँच करत असून, त्याद्वारे ग्राहकांना दारूची किंमत तपासण्यापासून ते ऑनलाइन पेमेंट करून ऑर्डर देण्यापर्यंत सर्व सुविधा, अवघ्या एका क्लिकवर मिळणार आहेत.

4 हजारांहून अधिक दुकानांमध्ये नवी सुविधा

राज्यातील 4038 TASMAC रिटेल दुकानांमध्ये ही सेवा लागू करण्यात येणार आहे. ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना जवळचे दुकान शोधता येईल. त्याचबरोबर त्या दुकानात कोणते ब्रँड उपलब्ध आहेत, त्यांची किंमत किती आहे आणि स्टॉक उपलब्ध आहे की नाही, याची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे दुकानात जाऊन चौकशी करण्याची गरज उरणार नाही.

ऑर्डर करा, QR Code घ्या आणि थेट दुकानातून दारू उचला

ग्राहकांनी ॲपवरून दारूची निवड करून ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर त्यांना एक QR Code दिला जाईल. हा QR Code संबंधित TASMAC दुकानात दाखवल्यानंतर ऑर्डर केलेली दारू ताब्यात घेता येईल. त्यामुळे दुकानांमधील लांबच लांब रांगा टाळण्यास मदत होणार असल्याचा दावा TASMAC अधिकाऱ्यांनी केला आहे.

एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारण्याला बसणार चाप

या ॲपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रत्येक ब्रँडची अधिकृत किंमत ॲपवर स्पष्टपणे दिसणार आहे. संपूर्ण व्यवहार ऑनलाइन होणार असल्याने ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्याची शक्यता कमी होईल. अनेक ग्राहकांनी जादा दर आकारल्याच्या तक्रारी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी TASMAC ने एमआरपीपेक्षा अधिक पैसे आकारल्याच्या आरोपांवरून अनेक कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. त्यानंतर किंमत निर्धारणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी हे डिजिटल पाऊल उचलण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, निश्चित किंमत आणि ऑनलाइन पेमेंटमुळे अशा तक्रारींमध्ये मोठी घट होईल.

इतर राज्यांमध्येही आधीपासून सुविधा

तमिळनाडूमध्ये ही सेवा 6 ऑगस्टपासून सुरू होत असली, तरी पश्चिम बंगालमध्ये eRetail पोर्टलद्वारे नोंदणीकृत ग्राहकांना ऑनलाइन दारू बुकिंगची सुविधा आधीपासून उपलब्ध आहे. ओडिशामध्ये देखील परवानाधारक दारू दुकाने आणि अधिकृत प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दारूची होम डिलिव्हरी करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तमिळनाडूही डिजिटल दारू विक्रीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणारे राज्य ठरणार आहे.

Follow Us
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!