म्हाताऱ्यावर प्रेम करुन मन भरलं, तो ब्रेकअप करत नव्हता, मग त्याला एकट्याला शेतात बोलावलं आणि….
प्रेमात माणसं अनेकदा टोक गाठतात. मनावर, भावनांवर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाच असतं. पण काहींना याचा विसर पडतो. आपण कधीकाळी त्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं, याचा विसर पडतो. मग माणूस नको ते करुन बसतो.

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. समवयस्कच नाही, तर काहीवेळा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीवर जीव जडतो. अशीच एक प्रेमकथा समोर आलीय. वयाने मोठ्या असलेल्या वृद्ध माणसाच्या प्रेमात ती पडली. सुरुवातीचे दिवस संपल्यानंतर तिला त्या वयोवुद्ध प्रियकराचा कंटाळा येऊ लागला. प्रेम करुन तिचं मन भरलं. याच दरम्यान तिचं नव्या व्यक्तीसोबत सूत जुळलं. पण वयोवुद्ध प्रियकर तिला विसरायला तयार नव्हता. त्यावेळी या प्रेयसीने नव्या जोडीदारासोबत मिळून एक भयानक कट रचला. त्याला मक्याच्या शेतात बोलावल व तिथे नव्या प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केली. बिहारच्या पूर्णियामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी प्रेमिका आणि प्रियकर दोघांना अटक करण्यात आली आहे.
अमौरच्या भतोरिया गावातील ही घटना आहे. प्रेयसीने नव्या प्रियकराच्या साथीने वयोवुद्ध प्रियकराची हत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक केलीय. त्यांची चौकशी सुरु आहे. वुद्धाचा मृतदेह शेतात आढळला. पोलिसांनी मारेकऱ्यांना शोधून काढण्यासाठी सर्विलान्स टीमची मदत घेतली. घटनास्थळी तिघांचे मोबाइल लोकेशन सापडले आहेत. त्या आधारावर हा खुलासा झाला.
आधी कुटुंबियांनी काय आरोप केला?
भतोरिया गावात 55 वर्षीय व्यक्तीचा मक्याच्या शेतात मृतदेह सापडला. कुटुंबियांनी जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांवर केला. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्यांना हत्या झालेल्या जागी तीन मोबाइल लोकेशन आढळले. यात एक नंबर महिलेचा, दुसरा पुरुषाचा आणि तिसरा मृतकाचा होता. पोलिसांना तपासात समजलं की, मृत व्यक्तीच महिलेबरोबर बरच बोलणं व्हायचं. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली.
शेतात भेटायला बोलावलं
चौकशीत महिलेने तिचा गुन्हा कबूल केला. महिलेच वयोवुद्ध प्रियकरापासून मन भरलेलं. म्हणून तिने नवीन प्रियकर शोधला. पण मृत व्यक्ती प्रेमसंबंध संपवायला तयार नव्हता. त्यानंतर महिलेने त्या व्यक्तीला शेतात भेटायला बोलावलं. तिथे नव्या प्रियकराच्या मदतीने तिने वृद्धाची हत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक करुन कोर्टात हजर केलं. त्यानंतर त्यांना जेलमध्ये पाठण्यात आलं.
