रस्त्यात बाईकवरती स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात, व्हिडीओ झाला होता व्हायरल

मुंबईच्या रस्त्यात बाईकचा स्टंट केल्यानंतर तरुणाचा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला होता. पुढे आणि पाठी तरुणीला बसवल्यामुळे अधिक व्हायरल झाला होता.

रस्त्यात बाईकवरती स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात, व्हिडीओ झाला होता व्हायरल
bike stunt
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 03, 2023 | 2:57 PM

मुंबई : बाईकवरती (bike) पुढे आणि पाठी मुली बसवून गाडीवरती स्टंट (stunt) करणाऱ्या तरुणाला मुंबईत बीकेसी (bkc police) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्या मुलाचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस तो व्हिडीओ कोणत्या परिसरातला आहे, याचा शोध घेत होते. त्या तरुणींना सुध्दा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती समजली आहे. हा स्टंट तरुणाने बीकेसीच्या रस्त्यावर केला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी फैयाज कादरी या नावाच्या तरुणाला अटक केली आहे. बीकेसी पोलिसांनी त्याची बाईक सुध्दा ताब्यात घेतली आहे. तरुणावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे.