AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक, पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा

India vs Pakistan Match Result : इशान किशन याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानने भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. भारताने अशाप्रकारे पाकिस्तान विरुद्धचा एकूण 14 वा विजय मिळवला.

IND vs PAK : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक, पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा
Ishan Axar Surya and Abhishek Sharma IND vs PAKImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Feb 15, 2026 | 10:52 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात टीम इंडियाने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला आहे.  टीम इंडियाने या विजयासह पाकिस्तान विरुद्ध विजयी होण्याची मालिका यशस्वीरित्या कायम राखली आहे.  भारताने सलामीवीर फलंदाज इशान किशन याच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर पाकिस्तासमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं.  त्यानंतर भारताच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 12 बॉलआधी ऑलआऊट केलं. भारताने पाकिस्तानला 18 ओव्हरमध्ये 114 धावांवर गुंडाळलं. भारताने या विजयासह वर्ल्ड कप मोहिमेतील आपला सलग तिसरा विजय मिळवला. तसेच भारताने यासह सुपर 8 फेरीत धडक दिली आहे.

टीम इंडियाचा आठवा विजय

भारत-पाकिस्तान यांच्यातील हा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील नववा सामना होता. टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील आपला विक्रम आणखी मजबूत केला. भारताने पाकिस्तानवर एकतर्फी मात करुन एकूण आठवा विजय मिळवला.

सामन्याचा धावता आढावा

पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. ओपनर अभिषेक शर्मा आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या दोघेही भोपळा फोडण्यात अपयशी ठरले. मात्र इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि रिंकु सिंह या 5 फलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. इशान किशन याने सर्वाधिक 77 धावा केल्या. तिलकने 25 आणि सूर्याने 32 धावांचं योगदान दिलं. शिवमने 27 धावा जोडल्या. तर रिंकुने नाबाद 11 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. भारतीय क्रिकेट संघाने यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च धावासंख्या उभारली.

पाकिस्तानसाठी सॅम अय्यूब सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. सॅमने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर सलमान आघा, उस्मान तारीक आणि शाहिन आफ्रिदी या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

पाकिस्तानला विजयी हॅट्रिकपासून रोखलं

पाकिस्तानच्या उस्मान खान याचा अपवाद वगळता इतर एकाही प्रमुख फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. उस्मान खान याने 44 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी शाहिन अफ्रिदी याने नाबाद 23 धावा करुन पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. शादाब खान याने 14 आणि फहीम अश्रफने 10 धावा जोडल्या. त्याव्यतिरिक्त इतर 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियासाठी हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवून मोहिम फत्ते केली.

Follow Us
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा