भाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू, विजय रहांगडालेंच्या मुलाचा कार अपघातात दुर्दैवी अंत

| Updated on: Jan 25, 2022 | 8:42 AM

Wardha Accident : देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली.

भाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू, विजय रहांगडालेंच्या मुलाचा कार अपघातात दुर्दैवी अंत
तिरोड्याचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कारचा अपघातात मृत्यू
Follow us on

वर्धा : वर्ध्यातील भीषण कार अपघातामध्ये भंडारा जिल्ह्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले (BJP MLA Vijay Rahangdale) यांच्या मुलावरही काळानं घाला घातला आहे. विजय रहांगडाले यांचे सुपुत्र (Son of BJP MLA Rahangdale) यांचा वर्ध्यातील भीषण कार अपघातात (Wardha Medical Student Car Accident) मृत्यू झाला असल्याचं वृत्त हाती येतंय. यामुळे रहांगडाले कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एकूण सात विद्यार्थ्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतेय. भाजप आमदार विजय रहांगडाले हे भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत. त्यांच्या मुलासह एकूण सात विद्यार्थी या भीषण अपघातात दगावले असून इतर सहा जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. इतर मृत विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. भीषण कार अपघातातानं सातही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाडा डोंगर कोसळला आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात भीषण अपघातांची मालिका सुरु असून आतापर्यंत झालेल्या तीन अपघातात 15 जणांचा गेल्या 48 तासांत जीव गेलाय. तब्बल चार तास मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. कारमधील एकाचाही या अपघातात जीव वाचू शकलेला नाही. एकूण सात जण या अपघातात मृत्युमुखी पडलेत.

पुलाचा कठडा तोडून कार थेट 40 फूट खोली कोसळली

मृतांमध्ये जिल्ह्यातीळ तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचा मृत्यू झाला आहे, यात इतर 6 जण विविध भागातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आले होते. अपघातातील मृतांची नावं खालीलप्रमाणे –

नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस
नितेश सिंग, 2015, इंटर्न एमबीएएस
विवेक नंदन 2018, एमबीएबीएस फायनल पार्ट1
प्रत्युश सिंग, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2
शुभम जयस्वाल, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2
पवन शक्ती, 2020एमबीबीएस फायनल पार्ट 1

नेमका कशामुळे अपघात झाला?

चारचाकी एक्सयुव्ही वाहनावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कार थेट पुलावरुन खाली कोसळल्यानं या अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तब्बल चार तास मृतदेह कारमधून बाहेर काढण्याचं काम सुरु होतं.

कुठून कुठे चालले होते?

देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली. तब्बल 40 फूट उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांचं वय 25 ते 35 च्या दरम्यान असल्याचं कळतंय. मध्यरात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, अपघातानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्यास सुरुवात केली होती.

संबंधित बातम्या :

कॉलेजमध्ये जात असताना मृत्यूनं गाठलं! तिघा भावंडावर काळाचा घाला, खड्डा चुकवण्याचा नाद जीवावर बेतला!

2 दिवसांपूर्वी स्कॉर्पिओच्या अपघातात तिघे दगावले! आता एकाला ट्रकनं चिरडलं, सोलापुरात अपघातांची मालिका

काम सुरु असलेल्या ब्रिजला कारची धडक, चौघांचा मृत्यू, सोलापूर-विजापूर रोडवर भीषण अपघात