Nashik : आग्रा महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीत सापडला मृतदेह, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

महाराष्ट्रात अनेकदा रस्त्यात असे प्रकार उघडकीस आले आहेत. काही वेळेला किरकोळ कारणावरून हत्या झाली. तर काहीवेळेला त्यातून गंभीर कारण बाहेर आलं आहे. या प्रकरणात नेमकं काय झालं आहे.

Nashik : आग्रा महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीत सापडला मृतदेह, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
आग्रा महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीत सापडला मृतहेह, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 8:28 AM

मुंबई – आग्रा (Agra) महामार्गावर खर्डी पोलीस स्टेशनच्या (Khardi police station) हद्दीत गोलभन गावाजवळ MH 06 AN 1436 या नंबरच्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीत पुरुष जातीचा मृतदेह सापडला आहे. सदर व्यक्तीची हत्या केल्याचा संशय असून शहापूर पोलिसांनी मयताचा मृतदेह मुंबई येथील जे. जे रुग्णालयात (J J Hospital) तपासणीसाठी पाठवला आहे. याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती मिळाली आहे. मृतदेहाचं शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागेल. कारण नेमका मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांची कसून चौकशीला सुरूवात

महाराष्ट्रात अनेकदा रस्त्यात असे प्रकार उघडकीस आले आहेत. काही वेळेला किरकोळ कारणावरून हत्या झाली. तर काहीवेळेला त्यातून गंभीर कारण बाहेर आलं आहे. या प्रकरणात नेमकं काय झालं आहे. याबाबत पोलिस कसून चौकशी करीत आहे. गाडीच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला जात आहे. कारण तिथून पोलिसांच्या चौकशीला सुरूवात होणार आहे. मृतदेह गाडीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथं नागरिकांनी प्रचंड गर्दी झाली होती. पुरुषाचा मृतदेह असून तो तिथल्या भागातला नसल्याचे स्पष्ट झाले आह

पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर संबंधित मृतदेहाची हत्या कशी झाली याचा उलघडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. एकाचं जागेवर स्कॉर्पिओ उभी असल्याने काही लोकांना शंका आली. त्यावेळी तिथल्या काही लोकांनी गाडीची पाहणी केली. त्यावेळी त्यांना गाडीत कायतरी गडबड झाली असल्याची लक्षात आली. त्यांनी ही माहिती जवळच्या पोलिसांना सांगितली.

हे सुद्धा वाचा

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संबंधित इसमाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.