
राजस्थान : राजस्थान (rajsthan) राज्यात गुरुवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. हा अपघात (Accident News) सरदाशहर जवळच्या मेगा हायवेजवळ झाला आहे. बोलेरो आणि ट्रक (bolero truck accident) या दोन वाहनात जोराची टक्कर झाली. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी प्रवाशांच्या ओरड्याचा जोराचा आवाज झाला. त्यावेळी बाजूने निघालेल्या लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्याचबरोबर सगळ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचं कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८ लोकांना मृत्यू झाला आहे.
तिथल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, त्या बोलेरोमध्ये २१ प्रवासी होते. त्यामध्ये लहान मुलांचा अधिक समावेश होता. बोलेरो गाडीतील सगळी माणसं केसरो महाराज यांना जेवून दिवून घरी निघाले होते. त्यावेळी समोरून आलेल्या ट्रकने त्या गाडीला जोराची धडक दिली. त्यावेळी तीन महिला, एक पुरुष आणि एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. गंभीर झालेल्या अपघातग्रस्त लोकांना तिथल्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्यावेळी अपघात झाल्याची माहिती गावच्या लोकांना मिळाली. त्यावेळी गावकऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. त्यापैकी आठजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. अधिक जखमी लोकांना राजकीय रुग्णालयात दाखल केले आहे. बाकीचे लोकं सरदाशहर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. गाड्यांचे अपघात अनेकदा चालकांच्या चुकीमुळे झाले आहेत. त्यामुळे रात्रीवेळेस गाडीतून प्रवास करताना अनेकांना भीती वाटते.