तिचा नाद सोड, दोनवेळा फोनवर धमकी आणि मारहाण, त्यानंतर पूर्व प्रियकराने जे केलं त्याने तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त

भाऊ-बहीण रात्री घराबाहेर ओसरीत झोपले होते. यावेळी एक तरुण आला. त्याने दोघांवर अ‍ॅसिड फेकलं. त्यानंतर तो त्याच शिघ्रतेने पळूनही गेला. तरुणीचा आणि तिच्या भावाचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील इतर सदस्य त्यांच्याजवळ आले.

तिचा नाद सोड, दोनवेळा फोनवर धमकी आणि मारहाण, त्यानंतर पूर्व प्रियकराने जे केलं त्याने तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 3:20 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथून भयानक घटना समोर आली आहे. भाऊ-बहीण रात्री घराबाहेर ओसरीत झोपले होते. यावेळी एक तरुण आला. त्याने दोघांवर अ‍ॅसिड फेकलं. त्यानंतर तो त्याच शिघ्रतेने पळूनही गेला. तरुणीचा आणि तिच्या भावाचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील इतर सदस्य त्यांच्याजवळ आले. त्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. घरातील इतर सदस्यांनी दोन्ही भाऊ-बहिणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सध्या दोघांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. या घटनेत तरुणी जवळपास 80 टक्के भाजली आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली

संबंधित घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पीडितेच्या घरातील इतर सदस्य आणि गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकून तपासाला सुरुवात केली. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांना तपासातून लक्षात आलं. पोलिसांनी याप्रकरणी तपास करत तरुणीचा पूर्व प्रियकराला ताब्यात घेतलं. त्यानंतर सर्व प्रकार समोर आला.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि पीडिता यांच्यात गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पीडितेच्या आयुष्यात आणखी एक तरुण आला होता. त्यामुळे आधीचा प्रियकर आणि पीडिता यांच्या नात्यात दुरावा आला. पूर्व प्रियकराने अनेकदा पीडितेला त्या तरुणासोबत बातचित करण्यास मज्जाव केला. यावरुन पीडितेचा नवा प्रियकर आणि पूर्व प्रियकर यांच्यात देखील भांडण झालं. याशिवाय पीडितेचं आणि पूर्व प्रियकराचं देखील कडाक्याचं भांडण झालं. पीडितेच्या नव्या प्रियकराने पूर्व प्रियकराला दोनवेळा मारहाण केली. तसेच फोनवर धमकी दिली.

आरोपीने कट आखत तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं

आपली प्रेयसीने आपल्याला धोका दिला या विचाराने पूर्व प्रियकर नैराश्यात गेला. त्याला तिचा राग आला. त्यातून त्याने तिला शिक्षा म्हणून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचा कट आखला. त्यानुसार त्याने रविवारी रात्री उशिरा पीडिता झोपलेली असताना अ‍ॅसिड टाकलं. यावेळी पीडितेजवळ तिचा भाऊ देखील झोपला होता. त्याच्या अंगावरही अ‍ॅसिड पडलं. या हल्ल्यात पीडितेच्या भावाचा एक हात आणि पायाला गंभीर इजा पोहोचली आहे. तर पीडिता 80 टक्के भाजली आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बिहारमध्ये पूर्वाश्रमीच्या प्रियकराला भेटण्यासाठी बोलावून लुबाडलं

एकीकडे रायबरेलीत प्रेमसंबंधातून अशाप्रकारचं कृत्य उघड झालंय. तर दुसरीकडे बिहारमध्ये एका तरुणीने पूर्वाश्रमीच्या प्रियकराला भेटण्यासाठी बोलावून लुबाडल्याची घटना समोर आली आहे. दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलेल्या तरुणीनेच तिच्या साथीदारांच्या मदतीने पूर्वाश्रमीच्या प्रियकराला लुटल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये समोर आली आहे. फिरायला जाण्याच्या बहाण्याने ती तरुणाला गंगेच्या घाटावर घेऊन गेली होती. तिथे तरुणी आणि तिच्या साथीदारांनी तरुणाला कारमध्ये बसवून शस्त्राच्या बळावर दागिने आणि मोबाईल फोन लुटला. तसेच त्याच्या बँक खात्यातील अडीच लाख रुपयांची रक्कमही दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केली. त्यानंतर धमकी देऊन आरोपींनी युवकाला सोडून दिले. पीडित सनी दीपक उर्फ ​​कबीर याने पीरबाहोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर बाबी नावाच्या मुलीला पोलिसांनी अटक केली असून तिच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.

हेही वाचा :

भावाकडे निघालेल्या विवाहितेची लूट, चोरट्यांनी बाईकसोबत फरफटत नेल्याने मृत्यू

कोर्ट मॅरेज केलं, कुटुंबापासून लपवलं, दोनच महिन्यात नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून संपवलं