कोर्ट मॅरेज केलं, कुटुंबापासून लपवलं, दोनच महिन्यात नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून संपवलं

दिल्ली पोलिसांकडून माहिती मिळताच, फरिदाबाद पोलिसांनी मुख्य रस्त्यापासून 10-15 फूट आत असलेल्या झुडपातून तरुणीचा मृतदेह शोधून काढला. फरिदाबाद पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. फरिदाबाद पोलिसांनी सांगितले की, सूरजकुंड पोलिसांना शुक्रवारी दिल्ली पोलिसांकडून हत्येची माहिती मिळाली होती

कोर्ट मॅरेज केलं, कुटुंबापासून लपवलं, दोनच महिन्यात नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून संपवलं
स्कूटीने कट मारल्याने हाणामारी, लाल रंगाने केला घात, थरारक घटनेने मिराभाईंदर हादरले
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 1:26 PM

नवी दिल्ली : दिल्ली सिव्हिल डिफेन्समध्ये काम करणाऱ्या महिलेची फरिदाबादमधील सूरजकुंड-पाली रस्त्यावर गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर, स्वतःला मुलीचा पती असल्याचे सांगणाऱ्या एका तरुणाने दिल्लीच्या कालिंदीकुंज पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले आणि हत्येची कबुली दिली. चारित्र्याच्या संशयातून तरुणाने तिची हत्या केल्याची माहिती आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र आपल्याला तिच्या लग्नाबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं आहे.

हत्येनंतर पतीचं आत्मसमर्पण

दिल्ली पोलिसांकडून माहिती मिळताच, फरिदाबाद पोलिसांनी मुख्य रस्त्यापासून 10-15 फूट आत असलेल्या झुडपातून तरुणीचा मृतदेह शोधून काढला. फरिदाबाद पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. फरिदाबाद पोलिसांनी सांगितले की, सूरजकुंड पोलिसांना शुक्रवारी दिल्ली पोलिसांकडून हत्येची माहिती मिळाली होती. त्यानंतर फरिदाबाद पोलिसांचे एक पथक एमव्हीएन-पाली रस्त्यावर मृतदेहाच्या शोधात गेले. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांना यासंबंधी माहिती देण्यात आली.

दिल्लीतील जैतपूरचा रहिवासी असलेला निजामुद्दीन याने दिल्ली पोलिसांना शरण जाताना सांगितले की त्याने पत्नी राबियाची हत्या केली आणि मृतदेह सूरजकुंड पाली रोडवर फेकून दिला. दुसरीकडे, मृत राबियाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, आपल्या मुलीचे लग्न झाले आहे, याची आपल्याला माहिती नव्हती.

कुटुंबीयांना लग्नाची माहितीच नाही

आरोपी निजामुद्दीनही राबियासोबतच सिव्हील डिफेन्समध्ये कार्यरत होता. त्यानेच आपल्या मुलीला नोकरी मिळवण्यास मदत केली. तेव्हापासून दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. अनेकदा निजामुद्दीन आपल्या घरीही येत असे, असंही राबियाच्या वडिलांनी सांगितलं. त्यांनी आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी निजामुद्दीनविरुद्ध सूरजकुंड पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदन केल्यानंतर मुलीच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला.

जून महिन्यात कोर्टात लग्न

दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की त्याला राबियाच्या चारित्र्यावर संशय होता. दोघांनी जून महिन्यात कोर्टात लग्न केले होते. मात्र, तो लग्नाचा कोणताही पुरावा दाखवू शकला नाही. आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने गुरुवारी सूरजकुंड पाली रोडवरील एका निर्जन भागात राबियाला बाईकवर आणले होते. तिथे त्याने दुचाकी थांबवली आणि राबियाला रस्त्याच्या कडेच्या झुडपात नेऊन तिचा गळा चिरून खून केला.

संबंधित बातम्या :

भावाकडे निघालेल्या विवाहितेची लूट, चोरट्यांनी बाईकसोबत फरफटत नेल्याने मृत्यू

दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीप, एक्स बॉयफ्रेण्डला पुन्हा भेटायला बोलावलं आणि…

बहिणींना माझं तोंडही दाखवू नका, प्रेयसीला अंत्यसंस्काराला बोलावू नका, सुसाईड नोट लिहित जिम प्रशिक्षकाचा गळफास

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.