गर्लफ्रेंडला घरी बोलावलं, बर्थडे केक कापला, किचनमध्ये गेला अन्… ‘त्या’ दिवशी काय घडलं?

कर्नाटकाच्या बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गर्लफ्रेंडचं अफेयर असल्याचा संशय आल्याने त्याने तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांंनी आरोपीला अटक केली आहे.

गर्लफ्रेंडला घरी बोलावलं, बर्थडे केक कापला, किचनमध्ये गेला अन्... त्या दिवशी काय घडलं?
boyfriend
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 15, 2023 | 2:34 PM

बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला. तिला घरी बोलावलं. तिच्याच हाताने बर्डकेकही कापला. त्यानंतर थोड्यावेळाने किचनमध्ये गेला आणि प्रेयसीचा चाकून गळा कापला. त्यामुळे त्याची प्रेयसी जागेवरच मरण पावली. ही घटना बंगळुरूच्या लागेरे येथील आहे. आपल्या प्रेयसीचं दुसरीकडे अफेयर सुरू असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळेच त्याने संशयाच्या भरातून प्रेयसीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

मृत तरुणीचं नाव नव्या असं आहे. ती 24 वर्षाची आहे. ती पोलीस दलात क्लार्क म्हणून काम करत होती. कानपूर येथे राहणाऱ्या प्रशांत नावाच्या तरुणासोबत तिचं गेल्या सहा वर्षापासून अफेयर होतं. दोघेही नात्याने भाऊ बहीण होते. त्यांच्या अफेयरची माहिती कुटुंबाला नव्हती. त्याचवेळी नव्या कुणाच्या तरी प्रेमात पडल्याचा संशय प्रशांतला आला. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वादही झाले होते. आपलं कुणाबरोबरही अफेयर नसल्याचं नव्याने त्याला वारंवार सांगितलं. पण त्याच्या डोक्यातून संशयाचा किडा काही जाईना. त्यामुळेच त्याने नव्याची हत्या करण्याचा प्लान तयार केला होता.

लास्ट लोकेशन

नव्याच्या बर्थडेच्याच दिवशी तिला संपवण्याचा त्याने कट रचला. त्यामुळे त्याने आपण एकत्र तुझा वाढदिवस साजरा करू असं सांगून तिला घरी बोलावलं. नव्यानेही होकार दिला. त्यानंतर ती त्याच्या घरी आली. त्यावेळी प्रशांतने घर चांगल्या पद्धतीने सजवलं होतं. त्यानंतर त्याने आधी नव्याच्या हाताने केक कापला. त्यानंतर किचनमध्ये जाऊन चाकू आणून त्याने तिची गळा कापून हत्या केली. त्यामुळे नव्या रक्ताच्या थारोळ्यात पडली. ही घटना घडल्यानंतर तो तिथून फरार झाला. नव्या उशिरापर्यंत घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिची लास्ट लोकेशन प्रशांतच्या घरी दिसून आलं.

गुन्हा कबूल केला

त्यानंतर पोलिसांनी लगेचच प्रशांतचं घर गाठलं. यावेळी त्यांना नव्या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली सापडली. पोलिसांनी तात्काळ तिचा मृतदेह ताब्यात घेऊन व्हिक्टोरिया रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी प्रशांतचा शोध घेत त्यालाही अटक केली. त्याने गुन्हा कबूल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.