अंगावरची हळद उतरण्याआधीच वधू पसार,दोन्ही घरात खळबळ, वराने डोक्याला हात लावला…
थाटामाटात लग्न लागले. त्यानंतर नववधू सासरी आली. तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. सगळ्या प्रथा रितीरिवाज पार पडले आणि चौथ्या दिवशी वधू अचानक गायब झाली...

धुमधडाक्यात लग्न लागले आणि वधू सासरी आली. नंतर चार दिवस वधूच्या स्वागतासाठी सासरीची मंडळी राबली. आणि लग्नाच्या चौथ्या दिवशीच वधू गायब झाल्याने खळबळ उडाली… लग्नाच्या केवळ चार दिवसानंतर ती आपल्या सासरचा पाहुणचार घेऊन माहेरी आली होती. आणि १२ जुलैच्या सकाळी ती अचानक पसार झाल्याचे कळल्याने नवऱ्याचे तर धाबेच दणाणले.. तिच्या कुटुंबियांनी खूप शोधाशोध केली परंतू तिचा काही थांगपत्ता लागलेला नाही. या घटनेने दोन्ही कुटुंबांना धक्का बसला आहे. या प्रकरणात गावात निरनिराळ्या चर्चांना पेव फुटले आहे.
उत्तर प्रदेशातील फिरोझाबाद जिल्ह्यातील दक्षिण थाना क्षेत्रात राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वत:च्या मुलीचे लग्न ४ जुलै २०२५ रोजी हाथरसच्या एका युवकांशी मोठ्या थाटामाटात केले होते. मुलीला सासरी पाठवणूक केल्यानंतर तिचे नव्या घरात मोठ्या जोशाने स्वागत झाले आणि चार दिवस सासरचा पाहूणचार घेऊन ती माहेरी गेली. माहेरी देखील तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. घरात आनंदाचे वातावरण होते. परंतू माहेरी आल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कुटुंबातील लोक सकाळी उटले तर मुलगी घरी नव्हती. तिला सर्वत्र शोधण्यात आले परंतू सर्व ठिकाणांवरून निराशा हाती आली.
खूप शोधाशोध केल्यानंतर तिचा काहीच पत्ता लागला नाही. तेव्हा कुटुंबाने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. कुटुंबियांना संशय आहे की गुल्लीत राहणाऱ्या आकाश राठौर यांनी त्यांच्या मुलीला फूस लावून स्वत:सोबत नेले.मुलीच्या पित्याने तक्रारीत म्हटले आहे की आकाश आधीपासून त्यांच्या मुलीला त्रास देत होता. या संदर्भात त्यांनी अनेक वेळा आकाशाच्या कुटुंबियांकडे तक्रार केली होती.
अनेक वेळा या तरुणाची तक्रार केल्यानंतरही ठोस कारवाई झाली नाही. आमच्या मुलीला १२ जुलैच्या सकाळी ५ वाजता आकाश याने घरातून नेल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. पोलिसांनी पालकांच्या तक्रारीनुसार आता या युवकाविरोधात गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे. युवतीच्या गायब होण्यामुळे तिचे सासरची मंडळी देखील त्रस्त झाली आहेत.
लवकरच शोध काढू
मुलीच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे की आता आम्ही समालाजा आणि मुलीच्या सासरच्या लोकांना काय उत्तर देणार ? या प्रकरणाने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. लवकरच मुलीचा शोध घेतला जाणार असून या प्रकरणातील सत्य काय आहे ते बाहेर येणार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
