मला हात लावू नकोस, नाहीतर.. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीच्या हातात जे दिसलं ते पाहून…

यूपीच्या बरेलीमधून एक प्रकार समोर आला आहे, जो अतिशय धक्कादायक आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूने तिच्या पतीला अशी एक गोष्ट सांगितली जे ऐकून त्याला धक्काच बसला. असं काय म्हणाली ती ?

मला हात लावू नकोस, नाहीतर.. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीच्या हातात जे दिसलं ते पाहून...
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 05, 2025 | 12:55 PM

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे एका तरूणाचं लग्न ठरलं, भावी वधूसोबत कसं जगायचं, वागायचं याची त्याने खूप स्वप्न रंगवली होती. लग्न धूमधडाक्यात पार पडलं, सगळे आनंदात होते. लग्नाच्या पहिल्या रात्री तो त्याच्या खोलीत गेला, तेथे त्याची नवी नवरीदेखील होती, पण तिच्या हातात जी गोष्ट होती ते पाहून त्या वराच्या पायाखालची जमीनच सरकली, त्याला मोठा धक्का बसला. लग्नानंतरची पहिलीच रात्र त्याच्यासाठी एक भयानक स्वप्न ठरलं. लग्नाचत्या पहिल्या रात्रीच त्याची वधू त्याला उद्देशून जे बोलली ते ऐकून त्याला फक्त चक्कर येणं बाकी होतं.

माझ्या जवळ येऊ नकोस, हात लावू नकोस

पीडित तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2025 मध्ये त्याचे लग्न झाले होते. लग्नानंतर तो रात्री पहिल्यांदा पत्नीला भेटला तेव्हा तिने त्याला दूर राहण्यास सांगितले. जर मला हात लावायचा प्रयत्न केलास तर मी विष खाईन, अशी धमकीच त्याने दिली. ते ऐकून हादरलेल्या पतीने तिला त्याचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली मी इतर कोणाची अमात आहे. त्या तरूणीचं आधीपासून दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होतं, आणि फक्त कुटुंबियांच्या दबावामुळे तिने तिच्या प्रियकराशी नव्हे तर दुसऱ्या तरूणाशी लग्न करण्यास होकार दिला होता, असं त्याने पोलिसांना सांगितलं.

लग्न नव्हे जणू खेळ

पोलिसात दिलेल्या तक्रारीत तरुणाने सांगितलं की, या वर्षी जानेवारीत त्याचं लग्न झालं. पण लग्नापासूनच त्याची बायको दूर रहात होती, अंतर राखलं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे तरुणाने हा प्रकार पत्नीच्या कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनी त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली. पत्नी आणि तिच्या घरचे हे मिळून आपल्याला मानसिक त्रास देतात असा आरोप त्या युवकाने केला. कधी त्याची पत्नी ही जीव देण्याची धमकी देते, तर कधी त्या तरूणाच्या वडिलांवर खोटे आरोप लावू असं धमकावलं जातं.

पीडित तरुणाने सांगितले की, लग्न झाल्यापासून घरात तणावाचे वातावरण आहे. त्याची आई हार्ट पेशंट असून या संपूर्ण घटनेमुळे तिची प्रकृती अधिकच खालावली आहे. अनेकवेळा हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, अशी तक्रारही तरूणाने केली. त्यामुळे अखेर त्याने निराश होऊन, शेवटचा पर्याय म्हणून त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करत तपास सुरू केला आहे. सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं.