AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारुच्या नशेत बहिण आणि आईवडिलांना शिवीगाळ करायचा, अखेर मेव्हण्याला संताप अनावर झाला !

इडलीचा व्यवसाय करणाऱ्या मारीकली याला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत तो दररोज पत्नी आणि सासु-सासऱ्यांना त्रास द्यायचा. मेव्हणा त्याला खूप समजवायचा, पण तो ऐकत नव्हता.

दारुच्या नशेत बहिण आणि आईवडिलांना शिवीगाळ करायचा, अखेर मेव्हण्याला संताप अनावर झाला !
कौटुंबिक वादातून मेव्हण्याने भावोजीला संपवलेImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 04, 2023 | 9:34 PM
Share

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : दारुच्या नशेत बहिण आणि आई-वडिलांना शिवीगाळ करायचा म्हणून मेव्हण्याने भावोजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीच्या खांबलपाडा परिसरात ही घटना घडली आहे. मारीकली तेवर असे मयत व्यक्तीचे नाव असून, रमेश तेवर असे हत्या करणाऱ्या मेव्हण्याचे नाव आहे. याप्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेने डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मयताला दारुचे व्यसन होते

डोंबिवली खांबलपाडा परिसरामध्ये मयत मारीकली तेवर हा पत्नी, तीन मेहुणे आणि सासू सासरे यांच्यासोबत राहत होता. मारीकली आणि त्याचे तिन्ही मेहुणे इडली विकायचे काम करतात. मारीकली याला दारू प्यायचे व्यसन होते. दारू प्यायल्यानंतर तो नेहमी सासू सासरे आणि बायको यांना शिवीगाळ करायचा. त्याच्या स्वभावामुळे सर्व वैतागले होते. नेहमीप्रमाणे आज दुपारी तो दारू पिऊन आला. घरामध्ये पुन्हा शिवीगाळ सुरू केली.

शिवीगाळला कंटाळून मेव्हण्याने भावोजीला संपवले

आपल्यासमोर आपल्या आई-वडिलांना आणि बहिणीला शिवीगाळ करत असल्याने मारीकरी याच्या मोठ्या मेव्हण्याने त्याला शांत करत समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही मारीकरी याची शिवीगाळ थांबवत नसल्याने अखेर संतपलेल्या धाकट्या मेव्हण्याने त्याच्यावर चाकूने हल्ला करत घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर जखमी अवस्थेत मारीकरी याला मोठ्या मेव्हण्याने आणि त्याच्या पत्नीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले. मात्र रक्तप्रवाह जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात मेहुणा रमेश वेलास्वामी तेवर याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?