नकोशीला बेवारस सोडून निर्दयी आई पसार, बुलडाण्यातील संतापजनक प्रकार

नकोशीला बेवारस सोडून निर्दयी माता (Mother Left Girl Child) झाली पसार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. बुलडाणा (Buldhana) जिल्हा सामान्य रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला सोडून जाताना ही निर्दयी आई सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. 

नकोशीला बेवारस सोडून निर्दयी आई पसार, बुलडाण्यातील संतापजनक प्रकार
mother left girl child
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 11:53 AM

बुलडाणा : नकोशीला बेवारस सोडून निर्दयी माता (Mother Left Girl Child) झाली पसार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. बुलडाणा (Buldhana) जिल्हा सामान्य रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला सोडून जाताना ही निर्दयी आई सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

एक महिन्याच्या नकोशी असलेल्या स्त्री जातीच्या बाळाला बेवारस टाकून एक अज्ञात महिला पसार झाल्याची धक्कादायक घटना 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलीय होती. सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी समोर स्त्री जातीचे बाळ टाकण्यात आले होते. याप्रकरणी रुगणालय प्रशासनाने पोलिसांत धाव घेऊन अज्ञात मातेविरुद्ध तक्रार दाखल केलीये.

बाळाला सोडून देतानाचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या बाळाची तपासणी करुन तिला बालकांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुणालयात गुरुवारी सायंकाळी परिचारिकांचा राऊंड सुरु असताना परिचारिका सुनिता काळवाघे यांना शासकीय रक्‍तपेढीजवळ एक बेवारस बाळ कपड्यात गुंडाळलेले दिसून आले, त्यांनी रुग्णालय प्रशासनाला याबाबत माहिती दिली असता तेथे उपस्थित असलेल्या डॉकटरांनी त्या बाळाची वैद्यकीय तपासणी केली. बाळाची तब्येत स्थिर असल्याची खात्री झाल्यावर त्या बाळाला तात्काळ अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

त्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करुन शहर पोलिसांत मातेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. ज्या महिलेने या बाळाला टाकले, ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे या बाळाच्या निर्दयी मातेचा शोध घेतला जात आहे.

संबंधित बातम्या :

भिंतीवर सुसाईड नोट, कुटुंबातील पाच जणांसह कुत्र्यालाही विष दिलं, आजी-नातीचा मृत्यू

Nagpur हवाला व्यापाऱ्यांवर सर्जीकल स्ट्राईक, 84 लाखांची रोकड कुठून केली जप्त?

विभक्त पत्नीला देखभाल खर्चाची थकबाकी त्वरित द्या, मुंबई पोलीस आयुक्त नगराळेंना हायकोर्टाचे आदेश