विभक्त पत्नीला देखभाल खर्चाची थकबाकी त्वरित द्या, मुंबई पोलीस आयुक्त नगराळेंना हायकोर्टाचे आदेश

गेल्या चार महिन्यांपासून हेमंत नगराळे यांनी देखभाल खर्चाची रक्कम दिलेली नसल्याचे याचिकाकर्त्या महिलेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. नगराळे यांनी थकबाकी भरण्यास उशीर करण्याची ही पहिलीच वेळ नाही, असाही दावा तिने केला होता

विभक्त पत्नीला देखभाल खर्चाची थकबाकी त्वरित द्या, मुंबई पोलीस आयुक्त नगराळेंना हायकोर्टाचे आदेश
हेमंत नगराळे, मुंबई पोलिस आयुक्त
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 8:39 AM

मुंबई : विभक्त झालेल्या पत्नीच्या देखभाल खर्चाची थकबाकी त्वरित द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना दिले आहेत. देखभाल खर्चाची रक्कम वाढवून देण्याच्या, तसेच पुणे किंवा नागपूरमधील चांगल्या परिसरात राहण्याची सोय करुन देण्याच्या मागणीसाठी नगराळे यांच्या विभक्त पत्नीने उच्च न्यायालयात याचिका केली होती.

काय आहे प्रकरण?

गेल्या चार महिन्यांपासून हेमंत नगराळे यांनी देखभाल खर्चाची रक्कम दिलेली नसल्याचे याचिकाकर्त्या महिलेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. नगराळे यांनी थकबाकी भरण्यास उशीर करण्याची ही पहिलीच वेळ नाही, असाही दावा तिने केला होता. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती एस. जी. दिगे यांनी विभक्त झालेल्या पत्नीला देखभाल खर्चाची थकबाकी त्वरित देण्याचे आदेश नगराळे यांना दिले आहेत.

काय आहेत आदेश?

सहा डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीपर्यंत हेमंत नगराळे यांच्याकडून थकबाकीची रक्कम याचिकाकर्तीला दिली जाईल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. देखभाल खर्चाची रक्कम वाढवून मागण्याच्या आणि पुणे किंवा नागपूरमधील चांगल्या परिसरात राहण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या याचिकाकर्तीच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने नगराळे यांना दिले आहेत.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. त्यानंतर नगराळे पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत होते. मार्च 2021 मध्ये त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.

पहिली नियुक्ती नक्षली भागात

आयपीएस अधिकारी झाल्यानंतर नगराळे यांची पहिली नियुक्ती चंद्रपूरच्या राजुरा येथे नक्षली भागात झाली होती. 1989 ते 92 दरम्यान त्यांनी या ठिकाणी एएसपी म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर त्यांना सोलापूरचे डीसीपी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 1992 मध्ये बाबरी मशीद कोसळल्यानंतर त्यांनी सोलापूरमधील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळली होती.

नगराळे यांची कारकीर्द

हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.

संबंधित बातम्या:

पिंपरीतील पेट्रोल बॉम्बचे गूढ उकलले, माजी नगरसेवकाने बर्थडे केक न कापल्याच्या रागातून हल्ला

दारूनं घात केला, आईनं जीव दिला, वडील तुरुंगात, लेकरांच्या डोक्यावरचं छत हरपलं, बीडमध्ये दुःखद घटना!

पुणे सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने 5 जणांना चिरडलं; तीन जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.