Nagpur हवाला व्यापाऱ्यांवर सर्जीकल स्ट्राईक, 84 लाखांची रोकड कुठून केली जप्त?

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी हा सर्जिकल स्ट्राईक केला. नागपुरात सुमारे दोनशे हवाला व्यावसायिक आहेत. हे व्यवसायिक कोट्यवधीच्या रक्कमेची हेराफेरी करतात. यापैकी नऊ ठिकाणी लकडगंज आणि इतवारीत पोलिसांनी धाडी टाकल्या.

Nagpur हवाला व्यापाऱ्यांवर सर्जीकल स्ट्राईक, 84 लाखांची रोकड कुठून केली जप्त?
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 10:40 AM

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. त्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी नऊ ठिकाणी झाडाझडती घेतली. हवालाची 84 लाख रुपयांची रोकड रात्री जप्त केली. यामुळं हवाला व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी हा सर्जिकल स्ट्राईक केला. नागपुरात सुमारे दोनशे हवाला व्यावसायिक आहेत. हे व्यवसायिक कोट्यवधीच्या रक्कमेची हेराफेरी करतात. यापैकी नऊ ठिकाणी लकडगंज आणि इतवारीत पोलिसांनी धाडी टाकल्या.

व्यापारी किराणा व धान्य विक्रीशी संबंधित

भुतडा अॅण्ड भुतडा कंपनीवर ही कारवाई केल्याचे समजते. शुक्रवारी दुपारी गजानन राजमाने यांनी भुतडा चेंबरवर छापा टाकला. यात अमरदीप टॉकीजवळ असलेल्या एका बड्या व्यापार्‍याच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. यात जप्त करणऱ्यात आलेली रक्कम हवालाची असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर पोलिसांनी इतवारी आणि लकडगंजमधील अन्य ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडी किराणा व धान्य विक्रीशी संबंधित व्यापारी आहेत.

दोन लॉकरमधून जप्त केली रक्कम

धान्य बाजार येथे दुमजली इमारत आहे. त्या इमारतीत 22 खोल्या आहेत. काही खोल्यांमध्ये भुतडा कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात हवालाच्या पैशांचा व्यवहार होतो, अशी माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली होती. येथील कारवाईदरम्यान पोलिसांनी सर्वप्रथम दोन लॉकरची तपासणी केली. त्यात 44 लाख रुपये मिळून आले. त्यानंतर उर्वरित खोल्यांची तपासणी केली असता आणखी दोन लॉकर मिळून आले. या दोन्ही लॉकरमध्ये 40 लाख रुपये सापडले.

लॉकर्समध्ये रोकड मोजण्याचे यंत्र

घटनास्थळी पोलिसांना दोनशेच्यावर लॉकर्स सापडली. हे लॉकर्स कुणाचे आहेत, हे पूर्णपणे समजू शकले नाही. बहुतांश लॉकर्समध्ये लाखोंची रोकड, नोटा मोजण्याचे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना याची माहिती देण्यात आली. प्राप्तीकर विभागाचे अधिकारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही स्वतंत्रपणे चौकशी करीत आहेत.

Special story हे राम, जगायचं कसं? सारं काही दूषित!

भाजपा खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष; महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार : नाना पटोले

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.