Badlapur : मद्यधुंद कारचालकाने थेट घरात घुसवली गाडी, बघ्यांना फुटला घाम, मग…

सुसाट आलेल्या मद्यधुंद कारचालकाला घरचं दिसलं नाही, गाडी थांबल्यानंतर लोकं पाहून गडबडला, पाहा काय केलंय ड्राईव्हरने

Badlapur : मद्यधुंद कारचालकाने थेट घरात घुसवली गाडी, बघ्यांना फुटला घाम, मग...
Badlapur car accident
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 20, 2023 | 9:21 AM

बदलापूर : सुसाट आलेल्या मद्यधुंद कारचालकाला (Drink and Drive) घरचं दिसलं नाही, गाडी थांबल्यानंतर लोकं पाहून गडबडला, त्यानंतर घरात घुसल्याची त्याला जाणीव झाली. तोपर्यंत तिथं घटना पाहणाऱ्या लोकांना घाम फुटला असल्याची माहिती समजली आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी कार घरात घुसली (Car Accident) त्यावेळी तिथं कोणीही नसल्यामुळे जीवीतहानी टळली. ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. बदलापूर पोलिसांनी (Badlapur police) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं

बदलापूरातील हेंद्रेपाडा परिसरात रात्री 11च्या सुमारास दारु पिऊन एकजण गाडी चालवत होता. सुसाट निघालेली गाडी एका घरात घुसली त्यावेळी कारचा चालक चालक चंद्रभान वर्मा पळून गेला होता. तर गौरव वर्मा याला पोलिसांमी ताब्यात घेतलं आहे.


अचानक झालेल्या अपघातात एका घराचं नुकसान झालं आहे. तर कारमधील चालक चंद्रभान वर्मा आणि गौरव वर्मा हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. अपघातानंतर चंद्रभान वर्मा पळून गेला, तर गौरव वर्मा याला पोलिसांमी ताब्यात घेतलं. दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवून अपघात केल्याप्रकरणी या दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.